कोरोनाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींद्वारे कोरोना पसरतो हे माहित असल्याने लोक अनेक गोष्टी करण्यापासून दूर राहू लागले आहेत. परंतु आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णानं कोणासोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते. पुरुषांच्या स्पर्ममध्ये शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरस सापडला आहे.

त्यामुळे चीनमध्ये निरोगी रुग्णांनाही शारीरिक संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. चीनच्या शांगक्यू या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 38 पुरुषांना कोरोनाची लक्षणे नव्हती.
यांपैकी 6 जणांच्या स्पर्ममध्ये कोरोनाव्हायरस आढळून आला. या 6 रुग्णांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते निरोगी झाले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या स्पर्ममध्ये पुन्हा कोरोना आढळून आला.

दरम्यान चीनच्या शास्त्रज्ञांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. अद्याप याबाबत ठोस पुरावे सापडले नाही आहेत. चीनमधील तज्ज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की,
कोरोना संक्रमित पुरुषांसोबत सेक्स केल्यानंतर व्हायरस पसरण्याचा धोका असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हा सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज नाही.

तरी शारीरिक संबंध ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्यामध्ये कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणंही असतील तरी जोडीदाराला त्याची लागण होऊ शकते.

नवीन लोकांशी संबंध बनवू नका , आपण आपल्याला सांगू की यावेळी, नवीन लोकांशी शारीरिक संबंध ठेवणे टाळा कारण यामुळे कोरोना विषाणूचा धोका वाढतो. हा एक असा आजार आहे जो जवळच्या संपर्कात आणि चुंबनाद्वारे एकमेकांपर्यंत पोहोचतो.
म्हणूनच, जर डॉक्टरांचा असा विश्वास आहे की आपल्या जोडीदाराशी आपले संबंध आहेत तर ते बरोबर आहे, परंतु जर नवीन लोकांशी संबंध वाढल्यास या विषाणूचा धोका वाढतो.
