सार्वजनिक ठिकाणी गोंधळ दोन जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल
बार्शी/प्रतिनिधी:
सार्वजनिक ठिकाणे गोंधळ घालून मोठमोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दोन इसम बार्शी शिवाजी कॉलेजसमोर छत्रपती बॉइज् होस्टेल शेजारी न्यु आशीर्वाद हॉटेल समोर आरोपी नामे 1) मोहन महादेव कसबे (वय-33 वर्ष) रा. नाईकवाडी प्लट उपळाईरोड एकता गणपती मंदिराजवळ बार्शी ता. बार्शी 2) मारुती भगवान बाराते (वय-46) रा.अलिपुर रोड गडशिंगे आपार्टमेंन्टच्या पाठीमागे भराडिया प्लॉट बार्शी ता. बार्शी
हे एकमेकांसोबत मोठमोठ्याने आरडाओरडा करुन शिवीगाळ करत एकमेकांना मारहाण करत भांडण करुन झुंज खेळत असल्याचे दिसुन आले व सार्वजनिक शांतता बिघडवीत असताना मिऴुन आले. म्हणुन त्यांचे विरुध्द भा.द.वि कलम 160 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.