सारोळे ग्रामपंचायतचा आदर्श उपक्रम …घरपोच सँनीटायजर मास्क वाटप !
सरपंच बाळराजे गाटे यांची माहीती
बार्शी: गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता ग्रामपंचायत तर्फे सारोळे ता .बार्शी येथे सँनीटायजर व मास्क वाटप करण्यात आले आहेत .

याविषयी अधिक माहिती देताना सरपंच बाळराजे गाटे म्हणाले की,प्रत्येक कुटुंबात एक बाटली सँनीटायजर प्रत्येक व्यक्तीला मास्क वाटप करन्यात आले आहे.ग्रामपंचायत तर्फे घरपोच साहित्य दिले आहे.

ग्रामपंचायतच्या माध्यमातुन नागरिकाना सुरक्षित आरोग्य लाभावे या उद्देशाने जवळपास 3500 मास्क व 700 बॉटल वाटप झाले आहे. इतर ग्रामपंचायतीनीह आपणही हा उपक्रम राबवून नागरिकाना आरोग्यविषयक सुरक्षा आधार दयावा असे आवाहन ही सरपंच गाटे यांनी केले आहे.
यावेळी पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे आशा सेविका सौ.रेणुका जोशी ,उबाळे अंगणवाडी सेविका ,प्रतिभा साबळे प्रमिला मुंबरे कर्मचारी अप्पा ठोंबरे विजय महापूरे उपस्थित होते.
नागरिकाना आरोग्य विषयक सुरक्षित साहित्य देत बार्शी तालुक्यातील सारोळे ग्रामपंचायतने आदर्श घालून दिला आहे… गावातील समस्त ग्रामस्थानी सरपंच व ग्रामपंचायतचे कौतुक केले आहे