नवी दिल्ली – सध्या भारतात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये गुरुवारी सलग 12व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलं.


इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज (गुरुवार) दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ रुपये ८१ पैसे, तर डिझेलचे दर ७६ रुपये ४३ पैसे झाले आहेत. तर, मुंबईत पेट्रोल ८४.६५ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.९१ रुपये प्रति लिटर, आज पेट्रोलच्या दरात ५३ पैसे व डिझेलच्या दरात ६४ पैशांनी वाढ झाली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा