सरकारी कामात अडथळा माहीती अधिकार कार्यकर्ता दीनानाथ काटकर यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  0
  266

  सरकारी कामात अडथळा  माहीती कार्यकर्ता दीनानाथ काटकर यांच्यावर गुन्हा दाखल

  गणेश भोळे

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


  बार्शी प्रतिनिधी :  बार्शी पंचायत संमितीअंतर्गत जि.प लघु पाठबंधारे उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना दमदाटी शिवीगाळ करुन गालावर चापट मारुन हातातील ऑफिसची शासकिय कागदपत्रे व डायरी हिसकावुन घेऊन फेकुन देवुन शासकिय काम करत असताना अर्जदार दीनानाथ काटकर याने शासकिय कामाच अडथळा आणल्याप्रकरणी मच्छिद्र मारुती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

  यात अर्जदार दिनानाथ काटकर (रा .जुनीचाटे गल्ली बार्शी ) याचेवर गुन्हा दाखल झाला आहे .


  याबाबत दिलेल्या फिर्यादित म्हटले की दिनानाथ काटकर याने माहीती आधिकाराअंतर्गत दि ६ व ७ डिसेंबर १९ रोजी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या सिमेंट बंधारे कामाच्याबाबत सन २०१५पासुन ते दिलेल्या तारखेपर्यंत माहीती मागितली होती .

  दिलेल्या अर्जात अर्जदार काटकर हा दारीद्र रेषेखालील नसल्याने सदर माहीतीच्या सांक्षाकित प्रतिसाठी ९०४२ रुपये इतका खर्च येत असुन तो भरण्याबाबत लेखी कळवले होते . सदर रक्कम भरण्यास अर्जदार काटकर याने नकार कळविला म्हणून काटकर यांना सदर माहीती अवलोकानार्थ ठेवण्यासाठी दि . ४,६,७ जानेवारी २०२० रोजी असे तीन दिवस असलेबाबत दि ३० डिसेंबर १९ रोजी कळविण्यात आले होते .

  परंतु सदर दिवशी कार्यालयात उपस्थीत राहीले नाही . सदर माहितीबाबत गटविकास अधिकारी तथा आपिलीय अधिकारी यांचेकडे आपिल अर्ज केला होता . सदर अर्जावर दि १७ मार्च २० रोजी सायंकाळी ५ वा . सुनावणी ठेवली होती . यावेळी मा .गटविकास अधिकारी यांचे कक्षामध्ये स्वतः गटविकास अधिकारी सभापती अनिल डिसले, प्रमोद वाघमोडे, इंद्रजित चिकणे, कार्यलयीन अधिक्षक अडसुळ ,लिपीक खुर्द, वरिष्ठ लिपीक डि.बी. भोसले ,अनिल जोशी उपस्थित असताना अर्जदार दिनानाथ काटकर हे सुनावणीसाठी आले होते .

  सुनावणी सुरू असताना काटकर यांनी सदरची सुनावणी ही नियमबाह्य आहे असे म्हणून गटविकास आधिकारी यांना तुमची तक्रार सीओकडे करतो असे म्हणून सुनावणीस अटकाव केला . व अर्वाच्छभाषेत शिवीगाळ करून माझेकडे छायांकित प्रतीचे पैसे मागतो काय, मला विकत घेता काय, तुझी नोकरीच घालवतो ,तुला बघुन घेतो असे म्हणत दमदाटी केली .व नंतर ते कार्यालयाचे बाहेर पडले .

  सोनवणे हे गटाविकास अधिकारी कर्मचारी ऑफिसमधुन शासकिय काम करण्यासाठी निघालो असता गट विकास यांचे कार्यालयाबाहेर व सभापती यांचे कक्षासमोर काटकर हे थांबलेले होते .

  आम्ही दिसताच कर्मचारी मला व भोसले व अनिल जोशी यांना रागाचे भरात मोठ्याने शिवीगाळ करत माझे अंगावर धावुन आला व तुला ऑफिसमध्ये कामच करू देत नाही असे म्हणून गालावर चापट मारली व हातातील ऑफिसची शासकिय कागदपत्रे व डायरी हिसकावुन घेऊन फेकुन देवुन शासकिय काम करत असताना अर्जदार काटकर याने शासकिय कामात् अडथळा आणल्याप्रकरणी बार्शी पोलिसात  भादवि कलम ३५३ , ३२३, ५०४ ,५०६ ,प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास सपोनि शिवाजी जायपत्रे हे करित आहेत.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur