सरकारी कामात अडथळा बार्शीत एकाविरुध्द गुन्हा दाखल

  0
  241

  सरकारी कामात अडथळा एकाविरुध्द गुन्हा दाखल

  बार्शी प्रतिनिधी :

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  घरासमोरील पोलवरिल चोरून वीज वापरत असल्याने लाईट आकडयाची केबल काढुन पंचनामा करित असताना तुम्ही माझा लाईटचा आकडा घेऊन जाऊ शकत नाही असे म्हणत एकाने तीन कर्मचाऱ्याना मारहाण व शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी  बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हि घटना दि. १८ मार्च रोजी दुपारी ४वा घडली .

  यात सचिन सुर्यकांत नवले याचे विरुध्द पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .

  याबाबत फिर्यादी किरण गजेंद्र मोरे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले की तंत्रज्ञ विष्णू पवार यांनी सांगितले की मौजे कांदलगाव येथील नवले वस्तीवर मोठ्या प्रमाणात घरगुती वीज चोरी होत आहे लगेच विदयुत साहाय्यक सागर आण्णासाहेब कदम, वरिष्ठ तंत्रज्ञ संदिप भगवान शिंदे, तंत्रज्ञ विष्णु कल्याण पवार, बाह्यस्रोत विजय नामदेव सातपुते असे सर्वजण सचिन सुर्यकांत नवले यांचे घराजवळील लाईटच्या पोलवर वायरचा आकडा टाकलेला दिसला त्यावेळी आमची खात्री झाली की सचिन नवले हा लाईटच्या खांबावरून चोरुन वीज वापरत आहे.

  म्हणून आम्ही सदर ठिकाणचे फोटो काढुन पोलकान लाईटचा आकडाखाली काढुन पंचनामा करत असताना सचिन नवले हा सदर ठिकाणी येऊन मी टाकलेल्या आकड्याची केबल तुम्हा का गोळा केली आम्ही त्यास समजावुन सांगितले की लाईट चा आकाडा हा बेकायदेशीर आहे .

  तुम्ही चोरुन वीज वापरत आहेत ते काय कायद्याने गैर आहे . त्यावेळी त्याने तुम्ही माझा आकडा घेऊन जाऊ शकत नाही असे म्हणून फिर्यादीला ढकलाढकली करून शिविगाळ करून सरकारी काम करत असताना अडथळा निर्माण केला याबाबत बार्शी तालुका पोलिस अधिक तपास करित आहेत

  Best IT Comany In Maharashtra , Solapur