सरकारवर अवलंबून न राहता लोकांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे – प्रकाश आंबेडकर

0
294

सरकारवर अवलंबून न राहता लोकांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे – प्रकाश आंबेडकर

ग्लोबल न्यूज: आजवर या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे. कोरोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे, असं चित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला आहे. लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे.’

तसेच सामान्य माणसाला माझे आवाहन आहे की त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा धरू नका, आपले मित्र मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना भेटायला सुरुवात करा, असं आंबेडकर म्हणाले आहेत.दरम्यान, कोरोनाच्या संकटात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्ष भाजप राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडत नसल्याचं दिसत आहे. तर सत्ताधारी देखील आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर देत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur