शेंद्रीकरांनी साजारा केला गावातील कुत्र्याचा जंगी वाढदिवस; सवाद्य मिरवणूक काढून गावकऱ्यांना दिले जेवण

  0
  265

  शेंद्रीकरांनी साजारा केला गावातील कुत्र्याचा जंगी वाढदिवस
  सवाद्य मिरवणूक काढून गावकऱ्यांना दिले जेवण

  बार्शी- आजवर आपण विविध नामांकित व्यक्ती, नेतेमंडळी, लहान मुले व ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे केलेले पाहिले आहे. मात्र बार्शी तालुक्यातील शेंद्री ग्रामस्थांनी चक्क गावातील गुणी व लाडक्या फिरस्ती कुत्र्याचा वाढदिवस लोकवर्गणीतून केक कापून, फटाक्यांच्याआतीषबाजीसह गावातील लहान-थोरांना जेवण देवून मोठ्या धुमधडक्यात साजरा केला. या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची पंचक्रोशी जोरदार चर्चा सुरु आहे.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  या सोहळ्यासाठी चारशे ते पाचशे गावकरी उपस्थित होते़
  शेंद्री गावामध्ये गेल्या ५-६ वर्षांपासून लालू नावाचा लाडका कुत्रा लोकप्रिय झाला आहे. लहान मुलांनी हात लावला तरी तो कोणाला चावत नाही. या कुत्र्याचा सर्वांना लळा लागला आहे. आपण माणसांचा वाढदिवस साजरा करतो

  मग प्राणीमित्रांचा का करु नये असा विचार काही युवकांच्या मनात आला व त्यामधून लोकवर्गणी करुन या कुत्र्याचा वाढदिवस धुमधडक्यात करण्याचे नियोजन करण्यात आले.
  यासाठी फत्तेसिंह निंबाळकर, तानाजी निंबाळकर, संजय पाटील, विनोद शहा यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी गावातून २० हजार रुपये वर्गणी गोळा झाली.वाढदिवसाच्या निमीत्ताने गावात डिजीटल फलक लावण्यात आले़ सोमवारी रात्री या लालूला हारतुरे घालून सजविण्यात आले.

  वाढदिवसाचा केक कापून डीजेच्या तालावर या कुत्र्याची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी लोणी ता परांडा येथून डिजे आण्यात आला़ यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी ही करण्यात आली़ यानंतर गावकºयांतर्फे लहान मुले व ज्येष्ठांना भात- सांबरचे जेवणही देण्यात आले. शेंद्रीकरांनी साजरा केलेल्या याआगळ्यावेगळ्या वाढदिवसाची पंचक्रोशीत मात्र जोरदार चर्चा आहे. ह वाढदिवस पाहण्यासाठी भोर्इंजे, शेंद्री, लोणी आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते

  Best IT Comany In Maharashtra , Solapur