शिवाजी महाविद्यालयास नॅकची A ग्रेड,प्राचार्य थोरात सरांनी हॅट्रिक करून दाखवली
बार्शी – श्री शिवाजी महाविद्यालयास NAAC मध्ये A ग्रेड मिळाल्या बद्दल अखिल भारतीय महाविद्यालयीन प्राचार्य अससोसिएशन यांनी मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट सन्मान चिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व महाविद्यालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवाजी महाविद्यालयाने A ग्रेड मिळवीन्यात हॅट्रिक केली आहे.


मान्यवरांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणचे प्रणेते कस्तुरीरंगन Bramhos cruz क्षेपणास्त्र चे जनक डॉ पिल्ले नागपुर महापालिकेचे महापौर श्री जोशी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलुगुरु देशपांडे महासॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर सोमाणी येस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ वंजारी अखिल भारतीय प्राचार्य कॉलेज प्राचार्य अससोसिएशनचे अध्यक्षडॉ महाजन उपस्थित होते. भारतातील एकूण दहा महाविद्यालयांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. देशभरातून एकूण 800 प्राचार्य या सोहळ्याला उपस्थित होते. त्यात, बार्शीची सरशी पाहायला मिळाली.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव उपाध्यक्ष श्री नंदन जगदाळे सचिव श्री वि एस पाटील सह सचिव पी टी पाटील खजिनदार श्री डी एस रेवडकर सर्व सदस्य महाविद्यालय चे सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचा वाटा मोलाचा आहे. हा सन्मान मी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या चरणी अर्पण करत आहे, असे थोरात सरांनी म्हटलंय.