शिवजयंती मिरवणुकीवर चुकीचा आक्षेप घेणारांवर कारवाई करा, शिवप्रेमींची बार्शी पोलीसांकडे निवेदनाद्वारे मागणी 

    0
    301

    शिवजयंती मिरवणुकीवर चुकीचा आक्षेप घेणारांवर कारवाई करा, शिवप्रेमींची बार्शी पोलीसांकडे निवेदनाद्वारे मागणी 

    प्रतिनिधी बार्शी 

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    छत्रपती शिवरायांच्या मिरवणूकीबाबत खोटी तक्रार देवून, चुकीचा आक्षेप नोंदविला याबाबत कायदेशीर कडक कारवाई करावी. अन्यथा, चुकीच्या, खोट्या, केसबद्दल शिवप्रेमी तीव्र आंदोलन करतील असे निवेदन शहरातील शिवप्रेमींनी पोलीस निरीक्षकांना संतोष गिरीगोसावी यांना दिले. 

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त राज, विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने शिवप्रेमींच्या सहभागाने भव्य मिरवणूकीचे आयोजन केले. सदर मंडळ १९८१ पासून दरवर्षी मिरवणूकीचे आयोजन करते. यावर्षीही या मिरवणूकीची रीतसर परवानगी घेवून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत २० ते २५ हजार शिवप्रेमी, झांज पथके, घोडे अन्य वाद्ये, शिवरायांच्या पोशाखातील मावळे यांचा सहभाग होता. ही मिरवणूक उत्साहात पार पडली. या मिरवणूकीची भव्यता, यशस्विता, नागरिकांचा सहभाग काहींना सहन न झाल्यामुळे तक्रार केली आहे. संबंधितांची कृती शिवप्रेमींची भावना दुखावणारी आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. चुकीचा आक्षेप नोंदविणारावर कारवाई करावी, अन्यथा शिवप्रेमी तीव्र आंदोलन करतील असे निवेदन दिले आहे. 

    यावेळी न.पा.सत्ताधारी गटाचे नगरसेवक दिपक राऊत, शरद फुरडे, किरण गाढवे, युवराज ढगे, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, नारायण जगदाळे, संतोष गायकवाड, निलेश मस्के, केदार पवार, शिरीष जाधव, महेश देशमुख आदी उपस्थित होते.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur