शिवजन्मोत्सव
युवा प्रतिष्ठाण च्या शिवभोजनाचा हजारो शिवभक्तांनी घेतला लाभ
—–
बार्शी : संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित युवा प्रतिष्ठाणच्या वतीने शिवजयंती सण उत्सवाप्रमाणे साजरी करण्याचा संकल्प करत बार्शीकरांसाठी शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ हजारो शिवभक्तांनी घेतला.

युवा प्रतिस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड यासह आगळी वेगळी संकल्पना मांडत स्टेज डेकोरेशन साकारण्यात येते. शिवजयंती निमित्त आयोजित शिवभोजना साठी १९ फेब्रुवारी रोजी दिवसभर मंडळाच्या वतीने पुरुष, महिला व व्हीआयपी अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती.
शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १५३ जणांनी रक्तदान केले. राकर्दन शिबिरात अनेक महिलांनी सहभागी होत त्यांनीही रक्तदान केले. रक्तदान शिबिर व शिवभोजनाचे उदघाटन हांडे गल्ली येथील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते शिवप्रतिम पूजन करून करण्यात आले. शिवमोहत्सवासाठी संस्थापक अध्यक्ष अँड.सुशांत चव्हाण, खजिनदार सदानंद गरड, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष रोहीत डोंगळे
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वायकुळे, भोजन कमिटी प्रमुख भोला अडसूळ, किल्ला बांधणी कमिटी स्वानंद धुमाळ, रक्तदान शिबिर प्रमुख अमर गाडे यांच्यासह युवा प्रतिस्थानचे सर्व सदस्य, शिवप्रेमी युवकांनी परिश्रम घेतले.