शहर पोलिस ठाण्यात दारुड्याचा धिंगाणा ,चक्क पोलिसाच्याच कानशिलात लगावली
बार्शी (गणेश भोळे )
बार्शी शहर पोलिस ठाण्यात एका दारूड्याने शिवीगाळ करत गोंधळ घालत कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांशी धक्काबुक्की करून एका पोलिसाला मारहाण करत तोंडावर चापट मारून खुर्चीची तोडफोड केल्याप्रकरणी दारुड्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे .

याबाबत किरण उत्तम खुने (वय २५ रा .ज्ञानेश्वर मठ अलिपूर रोड बार्शी ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे .
याबाबत पो कॉ रमेश महादेव माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि.६फेब्रुवारी २०२० रोजी रात्री १० वा सुमारास आरोपी किरण हा पोलिस ठाण्यात अचानक येऊन गोंधळ घालु लागला त्यावेळी पोलिसांनी त्यास समजावुन सांगत तुझी कोणाविषयी काही तक्रार आहे का अशी विचारणा केली त्याने कोणा विषयी तक्रार नसल्याचे सांगत आणखीणच गोंधळ शिवीगाळ करू लागला.
त्यावेळी त्यास तेथुन जाण्यास सांगितले तरीही त्याने फिर्यादीस धक्काबुक्की करून ठाणे अमंलदार भांगे यांना मारहाण करत तोंडावर चापट मारली व शिवीगाळ करत खुर्चीची तोडफोड करून नुकसान केले व शासकिय कामात अडथळा केल्याची घटना घडली याबाबत आरोपी किरण उत्तम खुने याच्याविरुद्ध भादवि ३५३,३३२, ४२७,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास बार्शी पोलिस करित आहे .