शंकरराव निंबाळकर’मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
गुरुशिष्यांचे अनोखा मिलन; जुन्या आठवणींना उजाळा
बार्शी (प्रतिनिधी): श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयातील सन २००२-२००५ च्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.२२) विद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

या स्नेहमेळाव्यासाठी तब्बल १५ वर्षानंतर शिक्षण, व्यवसाय व नोकरीनिमित्त एकमेकांपासून दुरावलेले मित्र पुन्हा एकत्र आले होते. केवळ मित्रच नव्हे तर त्यांना घडवणारे, ज्ञानदानाचे व सुसंस्कृतपणाचे धडे देणारे सेवानिवृत्त शिक्षकही उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुशिष्यांप्रती असलेला आदर, जिव्हाळा व प्रेम यांचा अनोखा मिलन पहावयास मिळाला.

दरम्यान, ‘गुरुदक्षिणा कृतज्ञता सोहळा’ या सत्रात सेवानिवृत्त माजी प्राचार्य व प्राध्यापक यांचा डी.एड.च्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच अध्यापक विद्यालय (डी.एड.) येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवता यावेत यासाठी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक गुंड यांच्याकडे स्मार्ट बोर्ड खरेदीसाठी २५ हजार रुपयाची रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

मार्गदर्शन सत्रात माजी विद्यार्थी तथा कर्जत (जि. नगर) येथील गटविकास अधिकारी प्रशांत काळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे वेल्हे (जि.पुणे) तालुका अध्यक्ष सुरेश कोळी, महेश शिंदे, सचिन आहेरकर, विक्रम डोईफोडे, बालाजी गायकवाड, विकास मोरे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी प्राचार्य एन. बी. सोलवट, एम.आर. भोसले, डी.बी. शितोळे, डॉ. वा.रं पाटील, प्राचार्य डॉ. डी.पी. गुंड, एस.एन.शेटे, एम. एच.शिंदे, ए.एस.धुमाळ, डॉ.जे.जी. माळी, डॉ.सी.एस.उपभगत, जे.पी. गायकवाड, आर.एन. साबळे, डॉ.जे.बी. जळकुटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष हजारे यांनी केले तर अशोक पठाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्शी तालुक्यातील यजमान माजी विद्यार्थी शरद येडके, ऋषिकेश भाग्यवंत, बालाजी गायकवाड, किरण जाधव, बालाजी मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.