व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन; लॉकडाऊन काळात उन्मेश शहाणे यांचा उपक्रम

0
537

व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिकपणे प्रबोधन

लॉकडाऊन काळात उन्मेश शहाणे यांचा उपक्रम

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : जग कोरोना या महाभंयकर विषाणूने त्रस्त अाहे. यावर कोणतीच लस न अाल्याने जगाची चिंता वाढली आहे. यावर शासन आणि प्रशासन लोकांना तोंडाला मास्क लावा सोशल डिस्टन्सिंग ठेवा असं वारंवार सांगत आहे, तरीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळतात. जबाबदार नागरिक म्हणून लोकांनी कसे वागावे या संदर्भात त्यांच्यामध्ये प्रबोधन व्हावे यासाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून उन्मेश शहाणे मार्मिकपणे प्रबोधन करत आहेत.

व्यंगचित्रकार उन्मेश शहाणे लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दररोज घडणाऱ्या घडामोडींवर व्यंगचित्रे काढत अाहेत.
सहज सोप्या भाषेतील ही व्यंगचित्रे लोकांच्या बेफिकिरीवर मार्मिक चिमटे काढून त्यांची कान उघाडणी करीत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात लोक घरात कंटाळू नये, म्हणून काही हास्य व्यंगचित्रेही प्रसिद्ध करीत आहेत.

त्यांच्या व्यंगचित्रे सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हाट्सॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांची व्यंगचित्रे घराघरात पोहचत आहे आणि वाचकांची त्यांच्या व्यंगचित्रांना पसंती मिळत आहे. या लॉकडाऊन काळात एकूण  ५५ प्रबोधनात्मक व्यंगचित्रे काढली आहेत. प्रत्येक व्यंगचित्र हे लोकांना आणि प्रशासनाला प्रबोधनात्मक संदेश देणारे अाहे.

लॉकडाऊनच्या काळात लोक व्यायाम करीत नाही त्याचे तोटे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, मास्क वापरावा, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाऊ नये, आरोग्याविषयी काळजी घेणे,कौटुंबिक अडचणी, विद्यार्थ्यांची कुचंबणा,  राजकीय घडामोड, महामारीची परिस्थिती, बँकेत, भाजीपाला घ्यायला गर्दीत जाऊ नये, गरिबांना साहाय्य करणाऱ्या संस्था, नागरिक यांच्याविषयी कृतज्ञता, नर्स, डॉक्टर, प्रशासन, पोलीस यांच्या सन्मानार्थ अनेक व्यंगचित्रे काढून त्यांनी जनप्रबोधन केले आहे.

चौकट

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

कोणताही कलाकार म्हटला की, तो फक्त एकाच कलेत निपूण असतो असे नाही, प्राविण्य असलेल्या एका कलेव्यतिरिक्त दोन तीन कलांचा तरी अविष्कार तासात दिसून येतो. अशीच काहीशी विविधता आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रतीत करणारी व्यक्ती म्हणजे उन्मेश शहाणे. ते मूळचे करमाळ्याचे. सलग सहा वर्षे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले जीडी आर्ट पेंटिंग आणि आर्ट टीचर डिप्लोमा असे दोन डिप्लोमा पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर स्थानिक दैनिकात त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून कामास सुरवात केली. शिक्षण घेत असताना गायन, वादन, फोटोग्राफी, अभिनय आणि नृत्य या कलेतही नैपुण्य मिळवत गेले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here