बार्शी : शहरातील अग्रगण्य सामाजिक संघटना म्हणून वृक्ष संवर्धन समिती कडे पाहिले जाते. या समितीच्या माध्यमातून शहर व तालुक्यात हजारो झाडांची लागवड व संवर्धन केले आहे. वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने ‘वृक्ष संवर्धन दिनदर्शिका’ काढण्यात येती. सन २०२३ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा श्रीमान रामभाई शहा ब्लड बँक येथे साजरा करण्यात आला.

बालरोग तज्ज्ञ डॉ.प्रशांत मोहिरे, उद्योजक प्रशांत पैकेकर, गौतमभाई कांकरिया, स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे, आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, प्रा.शशीकांत धोत्रे, हेल्थ क्लबचे भगवान लोकरे, पत्रकार गणेश गोडसे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांच्या संकल्पनेतून डिझाईन व रचना हर्षद लोहार, अक्षय काटकर व गजेंद्र साखरे यांनी पुर्ण केली.


कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री भगवंत व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पुजा व दीपप्रज्लनाने झाली.
प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले.आपल्या मनोगतात डॉ.प्रशांत मोहिरे आणि सचिन वायकुळे यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. मनोगत व्यक्त केले. शहारातील विविध स्तरातील मंडळी, उद्योजक, डॉक्टर, पत्रकार, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन विरेंद्र भंडे यांनी केले तर आभार महेश बकशेट्टी यांनी मानले. कार्यक्रमासाठी अजित कुंकुलोळ यांनी हॉल उपलब्ध करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणा देशमुख, राहुल तावरे,अक्षय घोडके, उमेश नलवडे,सचिन चव्हाण,डॉ.वसुदेव सावंत,डॉ.श्रीराम देशमुख,अजित नडगिरे,सुनिल फल्ले,डॉ.प्रशांत मांजरे,उदय पोतदार,संतोषकुमार गायकवाड,योगेश गाडे,अक्षय भुईटे,सौदागर मुळे,गणेश रावळ,सायरा मुल्ला,प्रथमेश नलवडे,राहुल दारुतकर आदींनी परिश्रम घेतले.