विवाहितेचा विनयभंग आणि मारहाण ; आई आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

0
291

विवाहितेचा विनयभंग आणि मारहाण ;
आई आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी .:  विवाहितेचा विनयभंग करून मारहाण केल्या प्रकरणी अजय रमेश पवार रा उपळाई ठोगे आणि त्याच्या आई विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अधिक माहिती अशी की उपळाई ठोगे येथील वीस वर्षाची विवाहिता दि ६ रोजी सकाळी दहा वाजता गावातील किराणा दुकानात समान  घेत असताना वरील आरोपी तेथे आला आणि तिच्या हाताला धरून चल आपण पळून जाऊ असे म्हणाला.

तेवढ्यात पीडित महिलेची सासू तिथे आली आणि आता तुझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देते असे म्हणाली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला त्यानंतर दुपारी चार वाजता आरोपी व त्याची आई फिर्यादी च्या घरी आले आणि आमच्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देते का असे म्हणून दगडाने मारहाण केली आहे.

तसेच आरोपीने दि ५ रोजी ही पीडित महिलेला अडवून तिच्या इच्छेविरुद्ध तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur