विवाहितेचा माहेरून दहा लाख रुपये आण अथवा घटस्फोट देऊ, म्हणून छळ पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल.
बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे विवाहितेला माहेरून दहा लाख रुपये आण म्हणून शारीरिक मानसिक छळ करून मारहाण केली व घटस्फोटाची धमकी दिल्याप्रकरणी पती सासू यांच्यासह पाच जणांवर सोनाली विकास क्षिरसागर, (वय 30) रा. मुंगशी वा. ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीचे लग्न २०१७ मधील झाले होते. सासरवाडीकडील लोकांनी व्यवस्थीत लग्न केले नाही, करणी- धरणी केली नाही, आमचा निटनेटका मान- पान केला नाही तसेच लग्नात दिलेले साहित्य चांगले नाही, तसेच चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरवरून दहा लाख रुपये (10,00,000/-रु) घेवून ये तसेच माझे चारित्र्यावर संशय घेवुन मला शारिरीक, मानसिक त्रास देवुन शिवीगाळी, मारहाण करून व उपाशी पोटी ठेवले तसेच माहेरहून पैसे न आणल्यास तुला नांदविणार नाही घटस्पोट देणार अशी धमकी दिली म्हणुन 1) सासु छाया सुरेश क्षिरसागर, 2) ननंद सुकेशनी सुदर्शन लाळे, रा. घाटने ता. मोहोळ, 3) ननंद प्रियंका सत्यवान गवारे रा. बावची ता. पराडा, 4) नातेवईक समृध्दी राष्ट्रीयकृत कोलगे, रा. समर्थनगर, मोहोळ 5) पती विकास सुरेश कापसे रा. मुंगशी ता बार्शी यांच्याविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.