विरोधकांना सत्ता नसल्याने अपचन – मंत्री आदित्य ठाकरे
ग्लोबल न्यूज: मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत्या आकड्यांवरून सध्या चिंता व्यक्त केली जात आहे तसंच विरोधी पक्षाकडून यावर राजकारण सुरू आहे. मात्र आकडे जेवढे वाढतील, तेवढं लवकर आपण पीकच्या जवळ जाऊ. तेवढ्या लोकांना आयसोलेट करू शकू आणि बरं करू शकू, असर मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. बीबीसी मराठीशी बोलत होते.

कोरोना विषाणूचा एकापासून दुसऱ्याला प्रादुर्भाव होतो किंवा लागण होते. जेवढे आकडे आपण सरकार म्हणून ओळखू किंवा लोकांना ते दिसतील तितक्या लोकांना बरं करून कोरोना महामारीची साथ आपण आटोक्यात आणू शकतो, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले होते.

जागतिक साथीच्या आजारावेळी किंवा त्यादरम्यान आपल्याला आकड्याला घाबरून चालणार नाही. येणाऱ्या आकड्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. जेव्हा एखादी साथ असते तेव्हा तुम्ही आकडे किती ओळखता, त्या रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करता, यात सरकारचं यश असतं असतं, असंही आदित्य म्हणाले.
देशात महाराष्ट्रच असे एक राज्य आहे जिथे विरोधी पक्ष अशा भावनेने काम करतोय जिथे महाराष्ट्र जर खाली गेला, जगाच्या मीडियात खाली दिसला तर त्यांना बरं वाटतं. विरोधी पक्षाच्या हातात सत्ता हातात नसल्याने त्यांना अपचन होत आहे आणि याला डायजीन किंवा जेल्युसिल हेच चालू शकतं, असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला