विधानपरिषद निवडणूक: पंतप्रधान मोदींच्या सभांवर बहिष्कार घालणाऱ्यांना संधी, खडसेंची खदखद

0
287

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळावं अशी अपेक्षा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पदरी अखेर निराशाच आली. भाजपकडून विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर यांना संधी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गेली 40 वर्षे भाजपसाठी निष्ठेने काम केले. अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे विधान परिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांवर बहिष्कार घालणारे गोपीचंद पडळकर यांना संधी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राष्ट्रवादीतून आलेल्या रणजीत सिंह मोहिते यांनाही पक्षाने संधी दिली. मी, पंकजा मुंडे, बावणकुळे यांना डावलण्यात आले.‌ पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे याचा विचार करण्याची गरज आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषद उमेदवारीवरून आपली खदखद व्यक्त केली.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-

Best IT Comany In Maharashtra , Solapur