कर्तृत्ववान घडलेल युवा नेतृत्व !
बार्शीतील युवा प्रतिष्ठान, हांडे गल्ली म्हंटल की सर्वांना एकच नाव आणि चेहरा आठवतो तो म्हणजे अँड सुशांत चव्हाण यांचा. एक काळ असा होता की हांडे गल्ली म्हंटल की राडा संस्कृती, हाणामारी – पोलीस स्टेशन या रोजच्याच गोष्टी या मुळे गल्लीच आणि परिसराची बार्शीत दबदबा पण चांगल्या लोकात नाव बदनाम.
मागील काही वर्षात सुशांत चव्हाण नावाच नव नेतृत्व उदयाला आल. स्व. अशोक चव्हाण यांनी सांगितलेल्या कोणावर अन्याय करायचा नाही अन् कोणाचा अन्याय सहनही करायचा नाही हा विचार घेऊन तसेच अँड बी. एन. (दादा) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच काम चालू आहे.
प्रारंभी मित्रांच्या आग्रहास्तव सुशांत ग्रुप ची स्थापना करुन युवकांचे संघटन सुरु केल. केवळ तरुणांचे संघटन न करता त्यांना चांगला विचार द्यायचा आणि एक चांगले नागरिक घडवायचेत या निश्चयामुळे अल्पावधीतच सुशांत ग्रुपचे नामकरण करुन युवा प्रतिष्ठान असे करण्यात आले.
या प्रतिष्ठानची अधिकृत नोंदणी करुन पदाधिकार्यांना त्यांच्या कामाचे वाटप करण्यात आले. मागील दहा वर्षापासुन युवा प्रतिष्ठानच्या वतीने अँड सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. शिवजयंती निमीत्त आयोजित रक्तदान शिबीरात आज पर्यंत सुमारे 2000 पेक्षा अधिक रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. शिव प्रसादाची संकल्पना राबवत घरोघरी शिवजयंती सन उत्सवा प्रमाणे साजरा करण्याचा आग्रह धरला. तसेच दहीहांडी उत्सव, हनुमान जयंती, सवारी (मोहरम) असे विविध उत्सव परिसरातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्रित साजरे केले जातात.
पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत ३१ डिसेंबर साजरा करताना व्यसनाच्या आहरी जाणारे तरुण पाहून विचलीत होणाऱ्या सुशांत यांनी मागील काही वर्षा पासुन ३१ डिसेंबर साजरा न करता पार्ट्यांवर होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. पर्यावरण रक्षणासाठी केवळ सोशल मिडीयावर संदेश न पाठवता. हांडे गल्ली, अर्जूनराव बारबोले शाँपिंग सेंटर, बार्शी कोर्ट पार्कींग, राजर्षी शाहु महाराज न. पा. शाळ क्रमांक ६ या ठिकाणी वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन सुरु ठेवले. अभिनेते अमीर खान व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेल्या पाणी फाऊंडेशन च्या कार्यात तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रिय सहभाग घेतला तसेच बार्शीतील अनेक युवकांना या कामात सामावून घेतले. यासाठी युवकांमध्ये जागृती केली. स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले.

स्वतः चा वाढदिवस साजरा न करता अंध, अपंग, मुकबधीर? एचआयव्ही ग्रस्त बालकांना मदत केली. स्वतः चा व्यावसाय सांभाळतानाच गल्लीतील, परिसरातील व मित्रमंडळींच्या प्रत्येक सुख-दुखात धावून जाणे या त्यांच्या स्वभावामुळेच त्यांच्या भोवती सतत युवकांपासून जेष्ठ लोकांचाही गोतवळा असतो. घरची परिस्थिती समाधानकारक असली तरी माझ्या सहवासात येणारी प्रत्येक व्यक्ती सुखी समाधानी असावी तरच मी समाधानी आहे असा त्यांचा स्वभाव राहीला आहे.
कयद्याची पदवी घेतली असली तरी कोर्टात उभराहुन पैसे मिळवण्यासाठी वकिली करण्यापेक्षा माझी गल्ली, परिसर, मित्र व गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची सामाजिक वकिली सुरु असते. असे विविध पातळ्यांवर काम करत असतानाही सवंग प्रसिद्धीपासून ते कोसो दुर असतात. मी केवळ प्रसिद्धीसाठी काम करत नाही आणि फार मोठे कम करतो असेतर मुळीच नाही. फक्त गरिब, वंचित आणि आपल्या सहवासात असलेल्या लोकांचे प्रश्न सोडवतो असे त्यांचे सांगणे असते. मागील 3 वर्षात अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
शिवजयंती, हनुमान जयंती, मोहरम असे आयोजन असुनही कधीही स्वतःचा व सहकार्यांचा डिजीटल लावला नाही. त्यांनी सुरवाती पासुनच डिजीटल संस्कृतीला बगल दिली त्यामुळेच सध्याच्या भाऊ, दादा, मालक, युवा नेते अशा स्वयंघोषीत नेतृत्वा पासून लांब राहिलेल अँड सुशांत चव्हाण हे ग्राऊंड लेवलच खरखूर नेतृत्व आहे. कर्तृत्ववान घडलेल या युवा नेतृत्वाचा आज वाढदिवस असुन त्या निमीत्ताने त्यांच्या कामाचा घेतलेला हा छोटासा आढावा. अँड. सुशांत चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
सुदर्शन हांडे, बार्शी