ज्येष्ठ स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिक श्री अविनाश भगवान उर्फ आप्पाजी देवकर निवर्तले
बार्शी प्रतिनिधी :
ज्येष्ठ स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिक श्री अविनाश भगवान देवकर उर्फ आप्पाजी यांचे आज दि२८ जानेवारी रोजी पहाटे ४ .३० वा माळेगल्ली येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . ते ९८ वर्षाचे होते. त्यांचेवर अंत्यसंस्कार मोक्षधाम येथे करण्यात आले यावेळी मोठया संख्येेनी
संघ परिवारासह सर्व स्तरातील नागरिक उपस्थीत होतेपश्च्यात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे जावई असा परिवार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व स्वातंत्र्यसैनिक अविनाश भगवान देवकर उर्फ आप्पाजींनी ७ जुलै १९४० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला त्यांनी गेल्या सत्तर वर्षात एक हि दिवस शाखा चुकले नाही अकरा वर्षे त्यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आप्पाची एक सत्याग्रही होते .
आयुष्यातील पहिले असहकार आंदोलन त्यांनी इयत्ता चौथी मध्ये असताना बालवयातच केलं लॉर्ड पंचम जॉर्ज यांच्या २५व्या वाढदिवसानिमित्त शाळेत खाऊचे वाटप करण्यात येणार होते खाऊ घेण्यास विरोध करून त्यांनी असहकार चळवळीत भाग घेतला. सन १९३९ मध्ये ‘भागानगर ‘ आंदोलनात पैठण येथे सत्याग्रह करून औरंगाबाद व निजामबाद तुरुंगात कठोर कारावासाची शिक्षा भोगली . १९४२च्या ‘ चलेजाव चळवळीत ‘ बार्शी शहरांमध्ये विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले . १९४९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील ४२ गावांमध्ये सत्याग्रह यशस्वी केला .
सन १९५० मध्ये गोहत्याबंदी करावी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ९६ गावांमधून पदयात्रा काढल्या . १९५८ ते १९६३ दरम्यान त्यांनी बार्शी नगर परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले १९५८ ते १९६२ च्या दरम्यान नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य होते . १९६२ मध्ये ‘कच्च करार मोर्चाला दिल्ली मेळाव्यात बार्शी येथुन गेलेला तुकडीच्या प्रमुख होते . भारतीय जनसंघाने सोलापूर जिल्ह्यात केलेल्या अनेक चळवळीमध्ये त्यांचा क्रियाशील सहभाग होता . त्यांना अनेक वेळा अटकही झाली .

१९६४ मध्ये झालेल्या गोवा मुक्तिसंग्राम मध्ये आप्पाजी यांचा सक्रिय सहभाग होता . सन १९७५ मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी पुकारली दिनांक ३ नोव्हेंबर १९७५ रोजी आप्पाजींना त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना रात्रीत सोलापुर व दुसऱ्या दिवशीच नाशिक येथील मध्यवर्ती काराग्रहात पोहचविण्यात आले १९ महिने ते नाशिकच्या जेलमध्ये मीसाबंदी म्हणून होते २३ मार्च १९७७ या दिवशी भारतीय जनतेने त्यांची सुटका केली
१९१४ मध्ये प्रमोद महाजन यांचे नेतृत्वाखाली थोडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला गोवंश हत्या बंदी चळवळ असो की बांगला देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून चळवळ असो त्यांनी प्रत्येक चळवळीत हिरहिरीने भाग घेतला .राष्ट्रीय संघाचे एक निष्ठावान चारित्र्य स्वयंसेवक म्हणून अशी त्यांची ओळख होती . सतत ८० वर्ष संघकार्य केले डॉ.हेगडेवारांना त्यांनी पाहीले व प.पु गोळवळकर गुरुजींचा सहवास त्यांना लाभला . संघाचे मोठमोठे आलेले प्रचारक आप्पाजींना भेटत त्यांच्याशी चर्चा करत असत .
आप्पांना आयुर्वेदाचे ज्ञान होते . बार्शी तालुक्यात माने गांव येथे वैदयकिय व्यवसाय सुरु केला .यातुनही त्यांनी समाजसेवा केली . बार्शी नगरपालिकेत जनसंघ या पक्षाचे निवडुन गेलेले आप्पाजी हे एकमेव नेते होते .स्वातंत्र्य पुर्वीच्या काळामध्ये आप्पाजींनी हैद्राबाद मुक्ती संग्राम ,भागानगर , दादरा, नगर ,हवेली ,गोवा मुक्ती लढयामध्ये भाग घेतला या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानाबददल १५ ऑगस्ट १९७२ रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिक श्री अविनाश भगवान देवकर उर्फआप्पाजींचा ताम्रपट देऊन दिल्ली येथे सत्कार करण्यात आला होता .