वाचा कोण होते वारीतले पहिले पत्रकार-वाचा नक्कीच आवडेल..
-श्री कृष्णराव रंधवे- चोपदार (गुरुजी)
वाचा नक्कीच आवडेल..
इ.स.१९६० ते १९७० दरम्यानचा काळ जेव्हा वारी फक्त बैलगाड्यांनी व्हायची..इंटरनेट, मोबाइल, गाड्या तर राहुच द्या पण रात्री मुक्काम तळावर पण कंदील-गॅसबत्ती असायच्या.. पेपरात वारी हा विषय रोज कसा यावा? यावर गुरुजींनी एक पद्धत सुरू केली…

१- वारीत सकाळची चाल सुरू झाल्यापासून ते दुपारच्या विसाव्यापर्यंतची बातमी लिहून एस.टी. ड्रायवर ला स्वारगेट पर्यन्त द्यायची तेथून तरुण भारतच्या ऑफिस पर्यन्त माणूस जोडायचा…
२- परत दुपारपासून ते सायंकाळी समाज आरती पर्यंतचा वृतांत त्या मुकामी गावाच्या टेलिफोन बूथ वरुन पुन्हा पुणे -तरुण भारत ऑफिस ला द्यायचा. या सर्व खटाटोपा मुळे दुसर्या दिवशी हा सर्व वृतांत लोकांना घरबसल्या वाचयला मिळायचा. हे सर्व रोज वारी पूर्ण होईस्तोवर करायचे तेही सर्व व्याप सांभाळून…
खरच त्या काळी केलेली ही मेहनत दिव्यच आहे..
.जिव्हाळा आहे माऊली प्रती!
दादांना नमस्कार