वाचा ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काय केल्या घोषणा

0
288

आत्मनिर्भर भारत : मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली :’स्वावलंबी भारत’ आर्थिक पॅकेज संदर्भात आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर हेदेखील अर्थमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या अगोदर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली.

त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पॅकेजसंदर्भात गेले काही दिवस सतत पत्रकार परिषदेतून माहिती देत आहेत. आज या घोषणांचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे.

शनिवारी केलेल्या घोषणांदरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केलीय. तसंच काही शस्त्रांच्या आयातीवर बंदी घालून देशातील संरक्षण उत्पादनाला चालना देणार, असंही त्यांनी म्हटलंय. यासाठी आॉर्डिनन्स कारखान्यांना कॉर्पोरेट स्वरूप देणार, त्यांचे खासगीकरण होणार नाही. शेअर बाजारात ऑर्डिनन्स फॅक्टीरीजचे लिस्टींग होणार अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केलीय.

  • स्थलांतरीत मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वेच्या तिकिटांचा ८५ टक्के खर्च केंद्र सरकारकडून करण्यात आला. रेल्वेतही खाद्यपदार्थ पुरवण्यात आले.
  • धान्य, गॅस आणि रोख रक्कमेची थेट मदत लोकांपर्यंत पोहचवण्यात आली. : अनुराग ठाकूर
  • २५ कोटी लोकांना मोफत गहू, तांदूळ पुरवण्यात आले. यासाठी एफसीआय, नाफेड आणि राज्यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं. लॉजिस्टिकचं आव्हान समोर असतानाही त्यांनी डाळ आणि धान्याचं वाटप केलं
  • आज मनरेगा, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, कंपनी अॅक्ट, ईज ऑफ डुइंग बिझनेस आणि राज्य सरकारच्या रिसोर्सवर लक्ष केंद्रीत करणार आहोत
  • बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मजुरांपर्यंत थेट मदत पोहचवण्यात आली
  • ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करण्यात आले. यामध्ये १६ हजार ३९४ कोटी खर्च झाले : अनुराग ठाकूर
  • २० कोटी जन-धन खात्यांत थेट १०,२२५ कोटी रुपयांचा लाभ पोहचवण्यात आला. उज्ज्वला योजनेचा लाभही सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात आला.
  • मोदींनी म्हटलं होतं ‘जान है तो जहान है’… सरकार गरिबांना लवकरात लवकर आर्थिक मदत आणि खाद्यपदार्थ पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही वक्तव्यांच्या उल्लेख करत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या घोषणांना सुरुवात केली
  • गेल्या काही दिवसांत जमीन, मजूर, लिक्विडिटी आणि कायद्यांबद्दल महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तीच श्रृंखला आज आपण पुढे नेणार
  • २० कोटी जन-धन खात्यांत थेट लाभ पोहचवण्यात आला. उज्ज्वला योजनेचा लाभही सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यात आला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur