“वाइन शॉप सुरू करा” या मागणीला राज ठाकरे यांचे स्पष्टीकरणं

0
380

“वाइन शॉप सुरू करा” या मागणीला राज ठाकरे यांचे स्पष्टीकरणं
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यातील वाईन शॉप सुरू करण्याची मागणी केली होती या मागणी नंतर शिवसेनेच्या सामना आग्रलेखातून राज ठाकरे यांच्या या मागणीवर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला प्रतिउत्तर म्हणून मनसे नेत्यांनी सुद्धा संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. यावर ६० व्या महाराष्ट्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राची प्रगती, जडणघडण, मग महाराष्ट्रावर कोणी कसे वर्चस्व गाजवले अशा सर्व मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. महाराष्ट्राची प्रगती हेच महाराष्ट्रावरचं संकट ठरलंय. याचा उलघडा त्यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे.
मी वाईन शॉप सुरू करा, असं म्हणालो होतो तो महसुलाचा विचार करून, तळीरामांचा विचार करून बोललो नव्हतो. असे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या मुलाखतीत दिले आहे. राज ठाकरे यांच्या मागणीनंतर त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या या मागणीला विरोध करणारे असे दोन गट राज्यात निर्माण झाले होते. मात्र या मागणीनंतर सेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर चालू झालेले दिसून येत होते. अखेर याचा खुलासा खुद्द राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur