वंचित आघाडीच्या बार्शी बंद ला उस्फुर्त प्रतिसाद

    0
    465

    बार्शी: केंद्र सरकारने केलेला सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या या बंदला बार्शीसह तालुक्यातील नागरिकांचा पाठिंबा मिळाला. आज बार्शी शहर तसेच बार्शी तालुक्यातील वैराग शहर ही बंद ठेवून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    बार्शी शहरातील मुख्य बाजार पेठ आज सकाळ पासून बंद होती. त्यात सोमवार पेठ, भांडे गल्ली, व्यापार पेठ , सराफ बाजार ही सकाळ पासून बंद होता. तर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजी पाला व फळे आडत बाजार आज उघडलाच नाही. त्यामुळे शहरातील मुख्य भाजी मंडई महात्मा फुले भाजी मंडई , टिळक चौक भाजी मंडई पूर्णपणे बंद होती.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    नागरिकत्व कायद्यास बार्शीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळाला. या आजच्या बंद मध्ये वंचित बहुजन आघाडी समवेत १८ पक्ष व संघटना सहभागी झालेया पाहायला मिळाल्या. तर वैराग शहर हे तालुक्यातील मोठी बाजार पेठ मानली जाते. तीही आज दिवसभर बंद असलेलली पाहायला मिळाली.

    आजच्या बंद मध्ये सर्व संघटना व नागरिक यांनी शहरातील मुख्य मार्गावरून निषेध नोंदविण्यासाठी मूक मोर्चा काढला. यावेळी या मूक मोर्चात महिलाचा सहभाग कमालीचा पाहायला मिळाला. या बंद व मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी व बार्शी तालुका पोलीस निरीक्षक गिरीश देशपांडे यांनी शहर व ग्रामीण भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here