लोक मला विचारतात तुम्ही घरी बसून काय करतायेत?, मी त्यांना सांगतो…’ वाचा पवाराचं उत्तर

0
443

मुंबई: सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा फैलाव झाला असून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी आता सगळीकडे लॉकडाउनची परिस्थिती आहे. ट्रेन, बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद करण्यात आली आहे. अशावेळी सर्वांनीच घरात बसावं असे आदेश सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेकांनी घरी राहणंच पसंत केलं आहे. यावेळी फक्त सामान्य नागरिकच नाही तर जवळपास सर्वच सेलिब्रिटी, राजकीय नेते हे देखील घरीच आहेत. 

कोरोना व्हायरससारखा जीवघेणा आजार पसरवू द्यायचा नसेल तर प्रत्येकाने घरात थांबणं हाच एकमेव आणि जालीम उपाय सध्या तरी आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरीच थांबले आहेत. दरम्यान, यावेळी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आपल्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आहेत. यावेळी पवारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जनतेला आवाहन केलं आहे की, ‘घरी राहा, सुरक्षित राहा.’ 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


दरम्यान, घरी राहिल्यानंतर नेमकं काय करायचं? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याचं उत्तर देखील स्वत: शरद पवार यांनी दिलं आहे. ‘अनेक जण मला विचारत आहे की, तुम्ही घरी राहून नेमकं काय करता आहात. तेव्हा मी त्यांना सांगतो की, पुस्तक वाचत आहे.’ 

असं ट्वीट करुन शरद पवार यांनी पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो देखील ट्वीटरवर शेअर केला आहे, तसंच घरातच थांबा, सुरक्षित राहा! असा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला आहे. 

दरम्यान, आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली आहे. तसंच सर्व जिल्ह्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्या आहेत. यामुळे आता राज्यातील जनतेला आपआपल्या घरात राहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे आता घरी राहिल्यानंतर पुस्तक वाचन, उत्तम संगीत ऐकणं, आपल्या कुटुंबीयांसोबत गप्पा-गोष्टी करता येतील. अनावश्यक गर्दी टाळल्यामुळेच आपण या रोगाला हद्दपार करु शकतो. त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी संयम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur