ग्लोबल न्यूज – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. ‘लॉकडाऊन 5.0’ मध्ये अनेक अटीमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार काही अटींवर कन्टेनमेंट झोनच्या बाहेर आठ जूननंतर धार्मिक स्थळे तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, चित्रपटगृहे व जीम मात्र बंदच राहणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्यांशी जुलैमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत देशभर संचारबंदी (कर्फ्यू) राहणार आहे.
शासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 ची मुदत 31 मे रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री यांनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काल (शुक्रवारी) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत ‘लॉकडाऊन 5.0’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने आज संध्याकाळी जारी करण्यात आला.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?

1.कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार
- कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन
- रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार
- रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
- रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी
- राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
- कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
- दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9.प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार
10.प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
11.शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय
- राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
