लॉकडाऊन : बार्शीतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा शेतात रंगला जुगाराचा डाव 

0
295

बार्शी : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी झाडाखाली सावलीत कपडे काढून चक्क पत्ते खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी लागू केलेली असल्याने एकापेक्षा अधिक जण एकत्र येऊ शकत नाहीत. या सर्व घटनेला गौडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी हरताळ फासला असून हे कर्मचारी पत्ते खेळत असलेले फोटो गौडगावातील एका व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल झाल्याने आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार उघड्यावर आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी शहर- ग्रामीण रुग्णालय तसेच इतर आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर, कर्मचारी, आरोग्य सेविका यांना अहोरात्र जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असून यांना असे काही तरी करायला कसा वेळ मिळतो, असा प्रश्‍न इतर कर्मचाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, हा फोटो आजचा नसून जुने असल्याचा कर्मचारी स्वतःचा बचाव करताना म्हणत आहेत. पण दोन कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला आहे. त्यामुळे हे फोटो जुने नाहीत, अशी चर्चा तालुक्‍यात रंगली आहे.हे फोटो भालगाव येथील असल्याचे बोलले जात आहे.

चौकशी करून कारवाई करू-जोगदंड

चौकशी करून कारवाई राजकीय पदाधिकाऱ्यांकडून कर्मचारी पत्ते खेळतानाचे फोटो मला मिळाले आहेत. तसेच ते व्हायरल झाले आहेत. हे फोटो गौडगाव येथील नसून भालगाव येथील शेतातील आहेत. हे कर्मचारी गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत आहेत. कनिष्ठ सहायक परिचर संवर्गातील कर्मचारी असून तांत्रिक कर्मचारी संवर्गातील नाहीत. योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात येईल.  – डॉ. संतोष जोगदंड, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी 

Best IT Comany In Maharashtra , Solapur