साध्या पध्दतीने लग्न ,१२० आशा वर्करसाठी ६१ हजरांची मदत
बार्शीतील गाडवे कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम
बार्शी : लॉकडाऊन मुळे साध्या पध्दतीने घरी लग्न केल्यामुळे बचत झालेल्या पैशातून बार्शीतील गाडवे कुटुंबाने तालुक्यातील १२० आशा वर्कर साठी तब्बल६१ हजरांची रोख मदत दिली आहे.


ही रक्कम नवं दांपत्याने बार्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांचेकडे सुपूर्द केली. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक मल्लिनाथ गाडवे,नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विजय गोदेपुरे, वर पिता अनिल गाडवे आदी उपस्थित होते.
बार्शीतील आडत व्यापारी अनिल गाडवे यांचा मुलगा ओंकार याचा विविध उस्मानाबाद येथील वैष्णवी सापणे हिच्याशी निश्चित करून आज बार्शीत लग्न करण्याचे नियोजन केले होते. मात्र लॉकडाऊन मुळे पत्रिका,मंगल कार्यालय, बॅंड परणा अशा सर्व बाबींना बगल देऊन आज दोन्ही परिवारातील मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये सोशल डिस्टन्स, मास्क अशा सर्व सूचनांचे पालन करून हा नियोजित विविध सोहळा संपन्न झाला आहे .
स्वतःचा जीव धोक्यात घालून शहर आणि ग्रामीण भागात लोकांच्या आरोग्यासाठी पायपीट करणाऱ्या आशा वर्कर यांना कामाच्या तुलनेने कमी पगारी आहेत अशा घटकांना थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न केला आहे असे मत मल्लिनाथ गाडवे यांनी व्यक्त केले.