‘लॉकडाऊनमध्ये पती रोजच सेक्सची मागणी करतो’ अंघोळ ही करत नाही, पत्नीची पोलिसांत तक्रार

0
272

बंगळुरू: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे सर्व नागरिक घरीच आहेत आणि दिवसभर आपला वेळ घरातच घालवत आहेत. याच दरम्यान एक वेगळीच घटना समोर आली आहे. बंगळुरू पोलिसांच्या महिला हेल्पलाईनवर एका महिलेचा कॉल करुन आपली तक्रार दाखल केली.

बंगळुरू येथील एका महिलेने पोलिसांच्या परिहार या विशेष हेल्पलाईनवर कॉल करुन आपली तक्रार दाखल केली. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तिच्या नवऱ्याने आंघोळ करणं बंद केलं आहे. महिलेचा आरोप आहे की २४ मार्चपासून पतीने आंघोळ केली नाही आणि दररोज सेक्सची मागणी करतो. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करापीडित महिलेने सांगितले की, तिचा पती एका किराना दुकानात काम करतो. मात्र, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दुकान बंद आहे आणि तेव्हापासून (२४ मार्च) त्याने आंघोळ करणंही बंद केली आहे. 

महिलेने असंही म्हटलं की, सध्या रोगराईमुळे स्वच्छता राखणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे. मात्र, पती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच दररोज सेक्स करण्याची मागणी करतो. ज्यावेळी त्याला सेक्स करण्यास नकार दिला तेव्हा मारहाण करण्यात आली असाही आरोप पीडित महिलेने केला आहे. 

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासाठीच विविध राज्यांतील पोलिसांनी विशेष हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. त्याच प्रमाणे बंगळुरूमधील या महिलेने केलेली तक्रार ही सुद्धा त्याचाच एक प्रकार आहे. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur