लॉकडाऊनचा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ग्लोबल न्युज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यातील जनतेशी फेसबुकच्या मध्यातून संवाद साधला. तसेच कोरोनाच्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातील काही उद्योग धंद्यांना मुभा देण्यात आलेली आहे.

आज इतर राज्याच्या परिस्थितीचा अहवाल रोज माझ्याकडे येत आहे. आज संध्याकाळीही मी आढावा घेणार आहे. परिस्थिती पाहूनच लॉकडाऊनचे काय करायचे याबाबतचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसापाऊन राज्यात चालू असलेला लॉकडाऊन कधी संपणार याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लॉकडाऊन कधी संपणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे.

लॉकडाऊनचे नक्कीच चांगले परिणाम आहेत. लॉकडाऊनमुळे करोना रुग्णांची गुणाकाराने होणारी वाढ संथ ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ नियंत्रणात आणली आहे. या लॉकडाऊनचा आपल्याला नक्कीच फायदा झाला आहे. लॉकडाऊन लवकर संपवण्यासाठी आणि या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण तज्ज्ञांची मदत घेत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.