लॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आला घालण्यासाठी मागील दोन महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या लोकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सुद्धा बसलेला आहे. आधीच एसटी महामंडळ तोट्यात असताना मागील दोन महिन्यापासून एसटीची प्रवाशी वाहतूक बंद असल्याकारणामुळे एसटीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता एसटीकडे आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके सुद्धा आर्थिक रसद उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.


त्यातच आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लोकडाऊनच्या खडतळं काळात पगारकपातीचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना उशिरानं देण्यात येणाऱ्या मे महिन्याच्या पगारात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एका परिपत्रकाद्वारे या मोठ्या निर्णयाबाबतची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
पगारकपातीचा हा निर्णय त्यात उशिरणारे येणाऱ्या निम्मा पगार अशा दुहेरी संकटात एसटीचा कर्मचारी भरडला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा मोठ्या प्रमाणात बंदच होती. परिणामी आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाच्या तिजोरीला आणखी फटका बसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.