लायन्स व लायनेस क्लब बार्शी टाऊनची बार्शीत महिलांची शिस्तबध्द समाजप्रबोधनात्मक रॅली
विविध महिला संघटनांच्या सखींचा समावेश
बार्शी प्रतिनिधी: लायन्स व लायनेस क्लब बार्शी टाऊन ,इनरव्हील क्लब बार्शी, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना निर्भया पथक व स्वयंम शिक्षण प्रयोग बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमीत्ताने शहरातू काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये महिलांनी आपली वेगवेगळी रुपे दाखवत समाजप्रबोधन केले.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या रॅलीचा नगराध्यक्ष अॅड़ आसिफ तांबोळी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, प्राचार्य प्रकाश थोरात, डॉ़ मिरा यादव, लायन्स क्लबचे अध्यक्ष अमित इंगोले, सचिव महावीर कदम, खजिनदार भूषण कदम, लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ़ गौरी गायकवाड, सचिवा शितल जैन, प्रकल्प समन्वयक गुुंजन जैन, डॉ़ कैवल्य गायकवाड, फौजदार प्रतिभा ठाकूर, बचत गटाचे राजकुमार शिंदे,रेश्मा राऊत,अतुल सोनिग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

या रॅलीच्या अग्रभागी साधना कन्या प्रशालेचे मुलींचे लेझीम पथक, प्रजापिता ब्रम्हकुमारी , लायनेस क्लबच्या सदस्या या दुचाकी वर फेटे बांधून विविध वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या़ इनरव्हील क्लब, सोलापूर जिल्हा माहेश्वरी संघटना, ब्राम्हण महिला मंडळ,,शहरातील महिला डॉक्टर त्यांच्या वेशभूषेत सामिल झाल्या होत्या.


मातृभूमीच्या प्रतिष्ष्ठानच्या मािहला नऊवार इरकलमध्ये मातृृभूमीच्या अन्नपूर्णा योजनेची माहिती देणारे फलक घेऊन घोषणा देत होत्या़ निर्भया महिला पथक, आशा वर्कर महिला, नगरपालिका स्वच्छता महिला, संस्कृती क्लब, आदिशक्ती ग्रुप ,भारत विकास,जिजाऊ ग्रुप, फ्रेंडस ग्रुप, परिवर्तन फाउंडेशन चे स्व संरक्षण या विषयी प्रात्यक्षिक दाखवणारे विद्यार्थी

विविध शाळातील शिक्षीका, स्वयंत शिक्षण प्रयोगाच्या महिला बचत गटाच्या सदस्या या रॅलीमध्ये होत्या़ डॉ़ क्षमा पाटील व वैभवी बुडुख यांनी विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषा केली होती़ त्या रथामध्ये बसलेल्या होत्या़ यावेळी विविध संघटनांच्या महिला हातात समाजप्रबोधनात्मक फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या़

या सर्व महिलांच्या अल्पोपहाराची सोय संस्कृती क्लबने केली होती़ तर सहभागी महिलांना पी़एऩजी-भाग्यश्री ज्वेलर्सच्या वतीने भाग्यश्री देशपांडे यांच्या यांनी प्रमाणपत्राचे वाटप केले़

रॅलीसाठी परिश्रम उपाध्यक्ष उमेश चौहान, अजित देशमुख,रवि बजाज, प्रकाश फुरडे, डॉ़ सागर हाजगुडे, निलेश जैन, डॉ़ श्वेतल सोमाणी, डॉ़ शरद पाटील,गणेश वैद्य, शंभूलाल भानूशाली,निर्भय पथकाचे विकास माने, पवन श्रीश्रीमाळ यांनी परिश्रम घेतले़ श्यामराज मॅडम यांनी सुत्रसंचलन केले़

