समुपदेशनासाठी 24 तास हेल्पलाइन सुरू, ठाकरे सरकारचा उपक्रम
कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इतर देशाच्या तुलनेत पाहिले तर भारतात रुग्णांची आणि मृतांची संख्या आटोक्यात आहे असेच म्हणावे लागेल. परंतु अनेक देशातील मृतांचा आकडा पाहून अनेकांनी अस्वस्थ होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे.

त्यातच 21 दिवसाच्या लॉक डाउनमुळे अनेक प्रकारचे विचार आज लोकांच्या मनात घोळत आहे. या चलबिचल मनावर उपचार म्हणून कोरोनामुळे घाबरलेल्या आणि नैराश्य आलेल्या नागरिकांचे बृहमुंबई महानगर पालिकेकडून तज्ञ व्यक्तींकडून समुपदेशन केले जाणार आहे.
राज्य सरकार आणि मनपा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये महानगर पालिका – एमपॉवर वन ऑन वन १८००-१२०-८२००५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भागांमध्ये पालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू राहणार आहे. आज जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचा आकडा, त्यात बंद पडले ले व्यवसाय यामुळे अनेकजण चिंतेने ग्रासले आहे.