लढा कोरोनाशी : शिवभोजन थाळी संदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; म्हणाले..

0
438

राज्यात चाचणी केंद्रे वाढवले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे आता काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. न्यूमोनिया रुग्णांची संख्या वाढणार आहे. खासगी डॉक्टरांनी डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे.  यावेळी खासगी डॉक्टरांनीही अशा रुग्णांचे एक्सरे आणि हिमोग्राम काढून घ्यावे. हा गुणाकाराचा काळ आहे. पण आपल्याला वजाबाकी करायची आहे. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील आधीचे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत. या युद्धात आपण नक्की जिंकू. हेही दिवस निघून जातील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कामगारांनी आपले स्थलांतर सुरु केले आहे. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. कृपा करुन गोंधळून जाऊन मोठी चूक करु नका. जिथे आहात तिथेच थांबा. महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करेल, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. गर्दी करुन नवीन संकट निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोना विषाणूमुळे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कामगारांनी आपले स्थलांतर सुरु केले आहे. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. कृपा करुन गोंधळून जाऊन मोठी चूक करु नका. जिथे आहात तिथेच थांबा. महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करेल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. गर्दी करुन नवीन संकट निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. 

तत्पूर्वी, त्यांनी नागरिकांनी संयमाचे दर्शन घडवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हे संकट मोठे आहे. त्यामुळे मदतीसाठी एक नवीन बँक खाते सुरु केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बँकर उदय कोटक यांनी यासाठी १० कोटींचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितेल. काही लोक रुग्णालयाचा सेटअप उभारुन करुन देत आहेत. विराट कोहलीही यात मागे नसल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी ५ रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे. शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.

याबाबत राज ठाकरे यांच्याशी बोलणे झाले असून त्यांनीही काही सूचना केल्याचे त्यांनी म्हटले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur