लग्न आणि सेक्स – भाग १

0
346

लग्न आणि सेक्स – भाग १

सौ.सुधा पाटील, सांगली

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

8459730502

समाजात फक्त दोनच प्रमुख जाती आहेत.एक स्त्री आणि दुसरी पुरुष.या दोघांच्या सभागृहातून पुढची पिढी तयार होत असते.तयार होणाऱ्या पिढीची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांच पालनपोषण व्हाव यासाठीच तर लग्न ही संस्था निर्माण झाली आहे.लग्न म्हणजे दोन मनांच मीलन! दोन जीव एकरुप होणं!अशा अनेक व्याख्या केल्या जातात.पण त्या केवळ साहित्यिक विश्वातच ऐकायला छान वाटतात.खरं तर वास्तव फार भयानक असतं.लग्न म्हणजे केवळ सेक्स साठी समाजानं दिलेला परवाना असतो.

त्यामुळे कुठेतरी एक मर्यादा घातल्या जातात.परंतू खरा विचार केला तर अनेक लग्नं ही नंतर नंतर केवळ तडजोड बनतात.कारण जशा इतर मूलभूत गरजा आहेत तशी सेक्स ही देखील मानवी जीवनास अत्यावश्यक अशी गरज आहे.परंतू नव्याचे नऊ दिवस झाले की नवरा बायको सेक्सकडे तितक्याशा गांभिर्याने पाहत नाहीत.

आयुष्यात सेक्स ही मरेपर्यंत मानवाला हवी असणारी गरज आहे हेच ते विसरतात आणि मग संघर्ष सुरू होतो.खरं तर सेक्सला संभोग असं म्हणतात.याचा अर्थच समान भोग घेणं, समान आनंद घेणं असा आहे.परंतू यात स्त्री ही केवळ एक भोग वस्तु, मुलांना जन्म देणारी किंवा पुरुषाच्या वीर्यस्खलनाच साधन या भावनेनेचं तिच्याकडे पाहिले जाते.किंबहूना तसेच संस्कार तिच्यावर लहानपणापासून केले जातात.त्यामुळे खुपदा बरचसं सेक्स विषयीची माहिती असूनही महिला गप्प बसतात.कारण तिच्यावर खुप तयारीची आहे,आधी अनुभव घेतला असेल असे टोमणे बसू नयेत असं तीला वाटतं.त्यामुळे बऱ्याच महिला मूल झाल्यावर त्याच्या संगोपनात स्वत:ला वाहून घेतात.खुपदा अति घरकाम, बाळाचं संगोपन यामुळे तिला सेक्सची भावना उरतच नाही.

अशा वेळी पुरुष तिला समजून न घेता दोष देत राहतो.आणि तिथेच त्यांच्यात अंतर पडत जातं. खरं तर अशावेळी पुरुष वर्गाने तिला सहकार्य करून तिच्यातील संवेदना जीवंत ठेवली पाहिजे.दोघांच शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे.कारण आरोग्य उत्तम असेल तरच उत्तम व आनंदी सेक्स लाईफ जगता येतं.स्त्रीवर्ग सतत कामात मग्न असल्याने सेक्सचा आनंद त्या घेऊच शकतं नाहीत.किंवा खूप जणींना खरा सेक्स काय हे माहितही नसतं.पुरुष वर्गही आपल्या बायकोलाही सेक्सचा आनंद घेता यावा याचा विचार करीतच नाही.केवळ यांत्रिकरित्या सेक्स उरकला जातो.

यात भावना नसतातच.त्यामुळेच लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एका घरातही अनोळखी असल्याप्रमाणे राहतात.त्यांच नातं जणू यांत्रिक बनतं जातं.खरं तर प्रेम बळकट करण्याचा उत्तम मार्ग सेक्स असतो.विज्ञान हेच सांगते की, सेक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.त्यामुळेच आनंदी जीवन जगता येतं.

अनेक ताणतणाव हे सेक्स मुळे कमी होतात.हे सारं खरं असलं तरी,याची जाणीव किती जणांना आहे? कितीजण याचा विचार करून आपलं सेक्स लाईफ हेल्दी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात? हेही विचारात घ्याव लागेल.त्यात सेक्स बाबत महिलांना जागृत करणेही खूप गरजेचे आहे.कारण सेक्स या क्रियेत दोघांचा क्रियाशील सहभाग महत्त्वाचा असतो.आणि आजही याविषयी प्रचंड अज्ञान आहे.

अरे जर स्त्री वर्गच याविषयी अज्ञानी राहिला तर मग ती नवऱ्याला साथ तरी कशी देणार?आज लग्न हे अरेंज असो किंवा लव्ह ते तेव्हाच नीट टिकू शकत जेव्हा तिथं सेक्स लाईफ हेल्दी असतं.नाहीतर मग केवळ ओढून ताणून तडजोड!

मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करत असताना मला लक्षात आलं की, मुलं झाल्यानंतर महिला सेक्सला फार महत्त्व देत नाहीत.किंवा कामाचा ताण यामुळे त्यांची ईच्छाच राहतं नाही. त्यामुळे संघर्ष वाढत जातात.नातं कोरडं बनतं जातं.अशावेळी दोघांनी एकमेकांना समजून घेऊन यावर मार्ग काढला पाहिजे.

त्यासाठी आधी सेक्स या विषयाची सखोल माहिती दोघांनाही असणं आवश्यक आहे.म्हणूनच निदान भावी पिढीला तरी याचं मार्गदर्शन करून लग्न ही संस्था बळकट केली पाहिजे.नाहीतर विवाहबाह्य संबंध वाढतच जाणार.कारण भूक लागली की माणूस जेवणं शोधतोच!हे अगदी नैसर्गिक आहे.मग तिथे स्त्री असो किंवा पुरुष!

महिलांशी चर्चा करताना जाणवलं की, पुरुष वर्ग महिलांना केवळ भोगवस्तू याप्रमाणे वागणूक देतो.तीचा आदर केला जात नाही.पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे तिला केवळ गृहितचं धरले जाते.तिच्यावर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार केले जातात.अशा ठिकाणी त्या नात्यात मानसिक जवळिकता राहतं नाही.

त्यामुळे अशा स्त्रिया नवऱ्याशी संबंध टाळण्याचा प्रयत्न करतात.नवऱ्याचा अनिच्छेने केलेला संभोग त्यांना बलात्कार वाटतो.तरीही पर्याय नसल्याचे बायका गप्प बसतात.अशी नाती शेवटपर्यंत तणावाखाली जगतात.आणि संपून जातात.यामुळेच अनेक महिला मनोरुग्ण बनत आहेत.यासाठी वेळीच जागृती गरजेची आहे.किमान यापुढचा समाज तरी आपण जागृत बनवू शकतो.

सेक्सचा खरा आनंद तेच घेऊ शकतात ज्यांची मनं एकरुप होतात कारण सेक्स शरीरांचा नसतोच.तो दोन मनांचा असतो.मनं सुंदर रित्या एकरुप झाली तरचं दोन शरीरं एकरुप होऊन संभोग करू शकतात.पण आपल्या समाजात सेक्स आणि लग्न यांचा संबंध केवळ मूलं जन्माला घालणं इतकाच आहे.जोवर ही विचार सरणी बदलत नाही तोपर्यंत समाजात अनेक गैरसमज पसरतं जाणार.

म्हणूनच सेक्स आणि जीवन याचा सहसंबंध मानवास वेळीच सांगायला हवा.भविष्यात विचारी, निरोगी लग्नसंस्था निर्माण करायची असेल तर तरूण पिढीला आधी सेक्स विषयी ज्ञान दिले पाहिजे.सेक्स हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा अधिकार आहे.निरोगी, आनंदी मानवी जीवनाचा सेक्स हा महत्त्वाचा घटक आहे.

म्हणूनच वेळीच हा विषय मोकळेपणाने समाजापुढे मांडूया.तरच समाज सुसंस्कृत बनू शकतो.

लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur