रेडक्रॉस सोसायटीच्या बार्शी शाखेच्या  मोफत रक्ततपासणी शिबीरात २१४० महिलांच्या रक्तांची तपासणी

    0
    231

    रेडक्रॉस सोसायटीच्या बार्शी शाखेच्या  मोफत रक्ततपासणी शिबीरात २१४० महिलांच्या रक्तांची तपासणी

    ४५० महिलांच्या इसीजी टेस्ट

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

     बार्शी प्रतिनीधी: 

    इंडीयन रेडक्रॉस सोसायटी शाखा बार्शी, ग्रामीण रूग्णालय बार्शी, व लायनेस क्लब बार्शी रॉयल , महालॅब्स  व ग्रामीण रुग्णालय बार्शी यांच्या संयुक्तपणे जागतिक महिला दिन व इंडियर रेडक्रॉस सोसायटीला शंभर वर्षे पुर्ण झाल्याच्या निमींत्ताने  खास महिलांसाठी रविवारी (ता.8 मार्च ) घेण्यात आलेल्या मोफत  रक्त तपासणी शिबीरात तब्बल २१४०  महिलांची तपासणी करण्यात आली़

    रविवारी श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या प्रांगणात  या शिबीराचा शुभारंभ शहरातील मान्यवर महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ़ विक्रम निमकर, राज्य ब्लड बँक असो़च्या सचिवा उज्वला वर्मा ,अ‍ॅड़ राजश्री डमरे, डॉ़ सर्वश्री सुनिता देशमुख अमिता पाटील, वर्षा मोरे, प्रणिता मांजरे, प्रभावती लाड, कविता जगताप ज्योती देशपांडे, स्वाती भातलवंडे, रोहीणी कोकाटे, वैशाली मोहिरे,डॉ़ सुनिता जगताप, लायन्स क्लबच्या डिस्ट्रीक प्रेसीडेंट वर्षा खांडवीकर, कल्याणी तम्मेवार,जीवन ज्योत संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अमृता कुंकुलोळ, ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ़ शितल बोपलकर, लायनेस क्लबच्या अध्यक्षा सोनल गुळमिरे ,डॉ़ बी़वाय़ यादव डॉ़ रामचंद्र जगताप, सुभाष जवळेकर, लक्ष्मीकांत काबरा, डॉ़ प्रशांत मोहिरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ  आदी मान्यवर उपस्थित होते़

    या तपासण्या केल्या

    सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत तपासणी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती़ या  शिबीरात प्रामुख्याने सीबीसी ( संपूर्ण रक्तातील घटक मोजणी) टीएसएच (थायरॉइड), एचबीए1 सी (ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबीन तपासणी), एसआर क्रिएटींन (किडनीची कार्यक्षमता), न्युरॉपॅथी टेस्ट (मजासंस्थेच्या रोगनिदान चाचणी), ब्लड ग्रुप (रक्तगट तपासणी)सी़ए़ १२५ स्पेशल कॅन्सर टेस्ट ,इलेक्ट्रोथेरेसीस हिमोग्लोबीन आदी तपासण्या केल्या़ तसेच ४५० महिलांच्या    ईसीजी टेस्ट ही करण्यात आल्या़  या सर्व तपासण्या तज्ज्ञांच्या मार्फत आधुनिक यंत्रणेव्दारे करण्यात आल्या .


    यावेळी बोलताना उज्वला वर्मा यांनी बार्शी रेडक्रॉसच्या कार्याचे कौतुक केले़  या ठिकाणी मोफत दिलेल्या या टेस्टची खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी सुमारे दोन हजार रुपये खर्च येतो़ आपण महिलांना अबला म्हटण्याची गरज राहीली नसून त्या आता सक्षम झालेल्या आहेत़ महिलांना कित्येक क्षेत्रात महिलांच अडचणीत आणत आहेत हे वास्तव आहे़ आपण मुलांवर संस्कार करतो मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात कमी पडतो त्यामुळे सर्व महिलांनी जागरुक राहून आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले़ सोनल गुळमिरे यांनी प्रास्ताविकात लायन्स क्लब व इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला़ नगराध्यक्ष आसिफ तांबोळी म्हणाले, रेडक्रॉस सोसायटीने अशा प्रकारच्या खर्चीक चाचण्या या शिबीरात मोफत ठेवून महिलांची चांगली सोय केली आहे़ कित्येक महिला आपला आजार हा अंगावर काढतात,मात्र अशा शिबीरांमुळे त्यांना त्यांची माहिती होण्यास देखील मदत होईल असे सांगत आज महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत हे नमूद केले़

    यावेळी डॉ़ अमिता पाटील राजश्री डमरे यांनी देखील विचार व्यक्त केले़ सुत्रसंचलन अमृता गुंडेवार यांनी केले तर आभार डॉ़ शितल बोपलकर यांनी मानले़ यावेळी महिला कर्मचाºयांचा ही मान्यवरांच्या हस्ते फेटे बांधून सत्कार करण्यात आला़

    शिबीर यशस्वीतेसाठी बार्शी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.शीतल बोपलकर, महालॅबचे डॉ़ संभाजी पाचकवडे, डॉ.प्रणिता मांजरे, संदीप कांगणे, राहूल नक्कावार, ऋतुजा बागल, गितांजली लोमटे, लायनेस क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्ष सोनल गुळमिरे, सचिव सीमा काळे, डॉ.स्नेहल माढेकर, सुजाता मुथ्था,प्रशांत बुडुख, धिरज कुंकुलोळ, बाळासाहेब तातेड, सागर नायकोजी, उदय पोतदार, यश कुंकुलोळ, सुजित गुंदेचा  यांनी परिश्रम घेतले़


    Best IT Comany In Maharashtra , Solapur