चीनमधून कोरोनाचा जगभरात प्रसार झाल्याने अनेक उद्योग बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा हिंदुस्थानला घेता येऊ शकतो. याच दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबूक यांच्यात टायअप झाल्याचे वृत्त आहे.

या दोन बड्या कंपन्या सोबत मिळून व्हॉट्सऍप प्लॅटफॉर्म आणि यूजर बेसचा फायदा घेत चायनीज सुपर-ऍप वी-चॅटला टक्कर देण्यासाठी एक मल्टीपर्पज ऍप बनवण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्या मिळून या प्रोजेक्टसाठी फंडिंग, टेक्निकल माहिती आणि डोमेन संबंधी माहिती घेत आहेत.

दै. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमिवर या ऍपला लाँच करण्यात येणार आहे. यूजर रिलायन्स रिटेल स्टोर्स किंवा jio.com वरुन किराणा किंवा जीवनावश्यक गोष्टी खरेदी करू शकतील. तसेच JioMoney चा उपयोग करुन पेमेंट करू शकतील. हे नवीन ऍप डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया, गेमिंग, एयर टिकट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगसारखे करेल.
दरम्यान या एका ऍप्लिकेशनमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला दोन प्रकारचा लाभ देईल. हे ऍप ग्राहक आणि व्यवसायिकांसाठी बीटूसी प्लॅटफॉर्म देण्यासोबतच उपयोगकर्त्यांच्या खर्चाबाबत माहिती देईल. सध्या याचे कमर्शियल प्रयोग सुरू आहेत. या कामासाठी मॉर्गन स्टेनलीला इन्वेस्टमेंट बँकर नियुक्त करण्यात आले आहे.


दहा टक्के हिस्सा खरेदी करण्याची योजना
24 मार्च रोजी फायनान्शियल टाईम्सने बातमी दिली की फेसबुक रिलायन्स जिओमध्ये कोट्यवधी डॉलर्सची हिस्सेदारी करत आहे. अहवालात म्हटले आहे की फेसबुक ‘अब्जावधी डॉलर्स’ खर्च करून रिलायन्स जिओमध्ये 10% भागभांडवल खरेदी करू शकेल. आणखी एक स्त्रोत म्हणतो की व्यावसायिक करार होणार आहे, परंतु कंपन्या एकत्रित कसे येतील हे व्यावसायिक संबंधांवर किती अवलंबून असेल हे अस्पष्ट आहे. तांत्रिक माहितीमुळे दोन्ही कंपन्या कशा जवळ येतील हे पाहणे बाकी आहे.

जर ते फेसबुक आणि रिलायन्सचे सुपर अॅप बनले तर रिलायन्स स्वत: ची वेगळी सेवा जोडेल. फेसबुकविषयी बोलल्यास दोन्ही कंपन्यांना फेसबुकच्या रीचचा फायदा होईल.
इन्स्टंट मेसेजिंग फ्रंटवर फेसबुक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया या अॅपमधील वापरकर्त्यांना सुविधा देईल. चीनमधील वेचॅट हे असेच अॅप आहे, जिथून पेमेंटवर मेसेजिंग व शॉपिंग केली जाते.