राष्ट्रवादीची मागणी गिरीश महाजन यांची कोरोना चाचणी करा

0
271

राष्ट्रवादीची मागणी गिरीश महाजन यांची कोरोना चाचणी करा

सूरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

माजी वैदयकीय शिक्षण मंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी तसेच त्यांना होमकॉरोंटाईन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.

मागील सात दिवस गिरीश महाजन हे मुंबई येथे वस्तव्यास होते. सध्या मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्या भागात जाऊन महाजन हे जामनेर येथे आले आहेत. नियमानुसार आमदार गिरीश महाजन यांची सर्व सामान्य लोकांप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस होमक्वारंटाइन करा.

गिरिश महाजन यांचे निवासस्थान हे दाट लोकवस्तीत असल्याने नियमानुसार कार्यवाही करावी. अशी मागणी जळगाव जिल्हातील जामनेर राष्ट्रवादीने केली आहे. गिरीश महाजन यांनी स्वतः पुढे ही येऊन तपासणी करून होमक्वारंटाइन व्हावे अस आवाहन ही राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे केले आहे. मात्र यावर गिरीश महाजन यांच्याकडून काहीही उत्तरं आलेले नाही आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur