राज्य सरकार मधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली अभिमानास्पद घोषणा

0
374

राज्य सरकार मधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली अभिमानास्पद घोषणा

कोरोनाच्या (Coronavirus) लढ्याविरोधात लढण्यासाठी उद्योगपती, अभिनेत्यांपासून अगदी सर्वसामान्यही मदतीला धावून आले आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडही मदतीसाठी पुढे आले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. केवळ महिन्याचा नको तर या वर्षीचा संपूर्ण पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे

तसेच त्यांच्यासह त्यांचा वाहन चालक व पीए यांचेही वेतन सरकारी तिजोरीत जमा करावे आणि गरजूंच्या व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यापूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार-खासदार यांनी एक महिन्याचा पगार राज्य सरकारन देण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यशासन लोकप्रतिनिधींच्या वेतनात कपात करणार आहे. माझा या वर्षीचा पगार राज्याच्या तिजोरीत जमा करावा अशी घोषणा आव्हाडांनी केली आहे.

कोरोनाच्या लढाईसाठी देशभरातून मोठी मदत सुरू आहे. अगदी उद्योगपती, अभिनेते, खेळाडू मदतीसाठी पुढे आले आहेत. नाम फाऊंडेशन यांच्यावतीने काल नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधी आणि पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले असून कोरोनाच्या लढाईत हातभार लावत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur