राज्यात सापडले ३२८ नवे रुग्ण, पाहा आतापर्यंतचा आकडा काय

0
258

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहेत. गेल्या अवघ्या २४ तासात राज्यात ३२८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील रुग्णांचा आकडा हा ३६४८ एवढी झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे आतापर्यंत महाराष्ट्रात आढळून आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात सकाळपासून ३२८ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १८४ रुग्ण हे मुंबईत तर ७८ रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. तर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मिळून एकूण ६६ रुग्ण आढळून आले आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला आहे. २१ दिवसांसाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत कायम राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल (बुधवार) याबाबतची  घोषणा केली. ‘२० एप्रिलपर्यंत प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाईल. ज्या भागात कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होईल.

जो भाग या अग्निपरीक्षेत यशस्वी होईल, त्यांना २० एप्रिलनंतर काही अत्यावशक सेवेसाठी सशर्त अनुमती दिली जाईल. बाहेर पडण्यासाठी कडक नियम राहतील. लॉकडाऊनची नियम तुटले तर सर्व परवानगी मागे घेतली जाईल. बेजबाबदार वागू नये.’ असं मोदी यावेळी म्हणाले होते. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur