मुंबई : राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ८७ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या १७५८ वर पोहोचली आहे. ६७३ पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. तर १८ पोलिसांचा आजवर मृत्यू झाला आहे.


करोनाच्या संकटात पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र करोनाने या योद्ध्यांना देखील आपल्या कवेत घेतले आहे. एखाद्या पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला आता ६५ लाखाची मदत दिली जाणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारकडून ५० लाख रूपये आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मुंबई पोलिस फाऊंडेशनकडून १० लाखाची मदत आणि खासगी बॅंक इन्श्युरन्सकडून ५ लाखाचा विमा असं या मदतीच स्वरूप असेल
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा