राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

0
309

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार- पृथ्वीराज चव्हाण

ग्लोबल न्यूज: राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये सध्या चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले आहेत. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारचीच चूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते मराठी वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्यानंतरही केंद्र सरकारने गांभीर्य ओळखलं नाही. दुर्दैवाने मुंबई विमानतळ सुरू ठेवलं. दररोज 16 हजार प्रवासी येत होते. त्या चौदा दिवसात किती प्रवासी आले असतील? जे प्रवासी आले त्यांना क्वॉरंटाईन केलं नाही. त्यांना होम क्वॉरंटाईन केलं. त्यामुळे हा आजार राज्यात पसरला आणि याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur