राज्यात आज 2259 नवीन कोरोना रुग्णांची नोंद पण रुग्ण बरे होण्याचा वेगही वाढतोय ; वाचा सविस्तर-कुठे किती रुग्ण

0
565

ग्लोबल न्यूज: आज राज्यात 2259 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 90,787 झाली आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1663 कोरोना मुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज 1663 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 42 हजार 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 90 हजार 787 इतका झाला आहे.पैकी सध्या 44 हजार 849 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 49 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 11 मे ते 6 जून या कालावधीत आहे.
या कालावधीत झालेल्या 71 मृत्यूपैकी मुंबई 45, ठाणे 11, मीरा भाईंदर 6, औरंगाबाद 3, पनवेल 2, नाशिक, रत्नागिरी, वसई विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 80 पुरुष तर 40 महिला आहेत. त्यातील 62 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 47 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 11 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 120 रुग्णांपैकी 91 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

मुंबई महानगरपालिका- 51,100 (मृत्यू 1760)

ठाणे- 1329 (मृत्यू 23)
ठाणे महानगरपालिका- 5171 (मृत्यू 131)
नवी मुंबई मनपा- 3695 (मृत्यू 87)
कल्याण डोंबिवली- 1977(मृत्यू 36)
उल्हासनगर मनपा – 570 (मृत्यू 21)
भिवंडी, निजामपूर – 342 (मृत्यू 12)
मिरा-भाईंदर- 979 (मृत्यू 45)
पालघर- 221 (मृत्यू 6 )
वसई- विरार- 1415 (मृत्यू 37)
रायगड- 764 (मृत्यू 29)
पनवेल- 736 (मृत्यू 29)
नाशिक – 269 (मृत्यू 8)
नाशिक मनपा- 535 (मृत्यू 22)
मालेगाव मनपा – 856 (मृत्यू 65)
अहमदनगर- 158(मृत्यू 8)
अहमदनगर मनपा – 52 (मृत्यू 1)
धुळे – 113 (मृत्यू 13)
धुळे मनपा – 177 (मृत्यू 12)
जळगाव- 868 (मृत्यू 100)
जळगाव मनपा- 281 (मृत्यू 15)
नंदुरबार – 40 (मृत्यू 4)
पुणे- 675 (मृत्यू 17)
पुणे मनपा- 8708 (मृत्यू 395)
पिंपरी-चिंचवड मनपा- 690 (मृत्यू 17)
सातारा- 658 (मृत्यू 27)
सोलापूर- 99 (मृत्यू 7)
सोलापूर मनपा- 1369 (मृत्यू 105)
कोल्हापूर- 643 (मृत्यू 8)
कोल्हापूर मनपा- 27

सांगली- 167 (मृत्यू 3)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 130
रत्नागिरी- 378 (मृत्यू 14)
औरंगाबाद – 58 (मृत्यू 2)
औरंगाबाद मनपा – 2027 (मृत्यू 108)
जालना- 209 (मृत्यू 5)
हिंगोली- 214
परभणी- 53 (मृत्यू 3)
परभणी मनपा-25
लातूर -108 (मृत्यू 4)
लातूर मनपा- 31
उस्मानाबाद-125(मृत्यू 3)
बीड – 63 (मृत्यू 1)
नांदेड – 33 (मृत्यू 1)
नांदेड मनपा – 138 (मृत्यू 67)
अकोला – 53 (मृत्यू 6)
अकोला मनपा- 795 (मृत्यू 32)
अमरावती- 22 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 281(मृत्यू 17)
यवतमाळ- 164 (मृत्यू 2)
बुलढाणा – 97 (मृत्यू 3)
वाशिम – 12 (मृत्यू 2)
नागपूर- 54
नागपूर मनपा – 734 (मृत्यू 12)
वर्धा – 11 (मृत्यू 1)
भंडारा – 42
चंद्रपूर -68
चंद्रपूर मनपा – 15
गोंदिया – 68
गडचिरोली- 45
इतर राज्ये/ देश- 78 (मृत्यू 20)
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 90,787
मृत्यू – 3289

Best IT Comany In Maharashtra , Solapur