राज्यातील रुग्णसंख्या झाली 27.5 हजार तर 6 हजार कोरोनामुक्त,बळींचा आकडा ही हजारांवर

0
261

ग्लोबल न्यूज- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27 हजार 524 झाली आहे. आज 1602 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 512 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 6,059 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 20 हजार 446 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 40 हजार 145 नमुन्यांपैकी 2 लाख 12 हजार 612 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 27 हजार 524 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज राज्यात 44 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 1019 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, नवी मुंबईत 10, पुण्यात 5, औरंगाबाद शहरात 2, पनवेलमध्ये 1 तर कल्याण डोंबिवलीमध्ये 1 मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी 31 पुरुष तर 13 महिला आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 16,738 (621)
ठाणे: 166 (3)
ठाणे मनपा: 1215 (11)
नवी मुंबई मनपा: 1113 (14)
कल्याण डोंबिवली मनपा: 424 (4)
उल्हासनगर मनपा: 82
भिवंडी निजामपूर मनपा: 39 (2)
मीरा भाईंदर मनपा: 248 (2)
पालघर: 42 (2)
वसई विरार मनपा: 295 (11)
रायगड: 166 (2)
पनवेल मनपा: 161 (9)
ठाणे मंडळ एकूण: 20,689 (681)
नाशिक: 98
नाशिक मनपा: 60
मालेगाव मनपा: 649 (34)
अहमदनगर: 55 (3)
अहमदनगर मनपा: 15
धुळे: 9 (2)
धुळे मनपा: 62 (4)
जळगाव: 171 (22)
जळगाव मनपा: 52 (4)
नंदूरबार: 22 (2)
नाशिक मंडळ एकूण: 1193 (71)
पुणे: 182 (5)
पुणे मनपा: 2977 (166)
पिंपरी चिंचवड मनपा: 155 (4)
सोलापूर: 9 (1)
सोलापूर मनपा: 335 (20)
सातारा: 125 (2)
पुणे मंडळ एकूण: 3783 (198)
कोल्हापूर: 19 (1)
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 36
सांगली मिरज कुपवाड मनपा: 7 (1)
सिंधुदुर्ग: 7
रत्नागिरी: 83 (3)
कोल्हापूर मंडळ एकूण: 158 (5)
औरंगाबाद: 95
औरंगाबाद मनपा: 621 (19)
जालना: 20
हिंगोली: 61
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 1


औरंगाबाद मंडळ एकूण: 799 (20)
लातूर: 32 (1)
लातूर मनपा: 0
उस्मानाबाद: 4
बीड: 1
नांदेड: 5
नांदेड मनपा: 52 (4)
लातूर मंडळ एकूण: 94 (5)
अकोला: 18 (1)
अकोला मनपा: 190 (11)
अमरावती: 5 (2)
अमरावती मनपा: 87(11)
यवतमाळ: 99
बुलढाणा: 26 (1)
वाशिम: 3
अकोला मंडळ एकूण: 428 (26)
नागपूर: 2
नागपूर मनपा: 329 (2)
वर्धा: 1 (1)
भंडारा: 1
गोंदिया: 1
चंद्रपूर: 1
चंद्रपूर मनपा: 4
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 339 (3)
इतर राज्ये: 41 (10)
एकूण: 27 हजार 524 (1019)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 14 हजार 253 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 59.04 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur