बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत, पोलिसांना निवेदन
बार्शी – शहरातील सर्व व्यापारी संघटनेच्या वतीने बुधवारी शहरातील लिंगायत बोर्डिंग येथे बैठक घेण्यात आली. यामध्ये, इथून पुढच्या काळात कोणत्याही कारणासाठी बंद पुकारल्यानंतर त्यामध्ये व्यापारी संघटना सहभागी होणार नाहीत, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

बार्शी बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते, शेवटी व्यापारी हाही सरकारविरोधी बंद पुकारणाऱ्या संघटना व मित्रांचाच बांधव असतो. मात्र, आधीच आर्थिक मंदीमुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांनी यापुढे बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच, यापुढे कोणीही बंद पुकारल्यानंतर अनुचित प्रकार घडू नयेत. यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. यासंदर्भात, शहरातील सर्व व्यापारी संघटनेच्यावतीने बार्शी पोलीस स्टेशनला निवेदनही देण्यात आले.अशाच प्रकारे कराड आणि पूना मर्चंट अँड चेंबर असो. ने देखील ठराव केले आहेत.