रश्मी उद्धव ठाकरे यांना पितृशोक ; माधव पाटणकर यांचे निधन

0
459

मुंबई : ‘सामना’च्या संपादिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. त्यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर (७८) यांचे मुंबईत निधन झाले. अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती.

दरम्यान रश्मी ठाकरे यांनी पितृशोक झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या नियोजित बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते. रश्मी ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून ‘सामना’ आणि ‘मार्मिक’च्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here