येडेश्वरी कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न करणार-बजरंग सोनवणे

0
47

खामगाव च्या येडेश्वरी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात संपन्न; आर्यनच्या थकीत बिलाचे ही वाटप केले सुरू

येडेश्वरी कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न करणार-बजरंग सोनवणे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: तालुक्यातील खामगाव येथील येडेश्वरी साखर कारखान्याच्या चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा त्र्यंबकेश्वर च्या स्वामी समर्थ गुरुपीठ चे प पू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ह. प. प. प्रकाश बोधले महाराज ,कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, संचालक डॉ. बाळकृष्ण भंवर,श्रीधर भंवर,नामदेव खराडे,सारिका सोनवणे, डॉ हर्षदा सोनवणे, परमेश्वर महाराज,सौरव व गौरव सोनवणे, सत्वशिला सोनवणे, मनोहर सोनवणे,श्रीकांत खराडे, संकेत पवार, तुकाराम वटाणे,मधूकाका बोदर,नीलकंठ शेळके आदी उपस्थित होते.

प्रारंभी मोरे महाराज व दाम्पत्याच्या हस्ते बॉयलर पूजा करून अग्नी प्रदीपन करण्यात आले.आण्णासाहेब मोरे महाराजांनी आपल्या भाषणात इथेनॉल चा प्रकल्प लवकर सुरू करा. आपल्या मागे स्वामींचा आशीर्वाद आहे.सोलापूर जिल्ह्यातील जनता भाग्यवान आहे कारण इथ हजारो वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदायाचे पंढरपूर आहे.आणि स्वामी समर्थांचे मंदिर आहे.

प्रास्ताविकात संचालक श्रीधर भंवर म्हणाले की, कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. बजरंग सोनवणे यांनी तो घेतला आहे. सोनवणे हा शेतकऱ्यांविषयी कळवळा असणारा माणूस आहे. हा कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती निश्चितपणे सुधारेल.शेतकरी, कामगार या सर्वांना योग्य न्याय देण्याचे काम करतील असा विश्वास व्यक्त केला.

बजरंग सोनवणे म्हणाले की,12 वर्षांपूर्वी आंनदगाव सारणी येथे आम्ही येडेश्वरी चे युनिट एक काढले.त्याठिकाणी शेतकऱ्यांना चांगला दर दिला जात आहे. आता हा कारखाना सुरू केला आहे.आजबपाच जणांना जुन्या थकीत उसाची बिले अदा केली आहेत. इथेनॉल पुढील वर्षी इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असून ,गाळप क्षमताही वाढवली जाणार आहे. येडेश्वरी कारखान्याकडून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देऊ अशी घोषणा ही सोनवणे यांनी यावेळी केली.

प्रकाश बोधले महाराज म्हणाले , इथे वैभव नांदेल. शेतकऱ्यांची प्रगती होईल. साखर क्षेत्रातीलअनुभवी सर्जन आलाय, शेतकऱ्यांनो आता काळजी करू नका.

चौकट

जुन्या आर्यन कारखान्याच्या मॅनेजमेंट कडून थकीत असलेली 2014-15 च्या थकीत ऊस बीलाचे 3 जानेवारी पासून वाटप करण्यात येणार होते.मात्र आजच्या कार्यक्रमात पाच शेतकऱ्यांना मोरे महाराज आणि बोधले तसेच जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत चेकचे वाटप करण्यात आले.यामुळे प्रभाकर देशमुख यांनी देखील आनंद व्यक्त केला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here