युवा प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी रोहीत डोंगळे तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायकुळे

  0
  233

  युवा प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी रोहीत डोंगळे तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायकुळे

  बार्शी  : शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित युवा प्रतिष्ठाण, बार्शी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही तमाम हिंदुस्थानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव उत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी रोहीत डोंगळे तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायकुळे यांची निवड करण्यात आली असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अँड.सुशांत चव्हाण यांनी सांगितले. 

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  शिवजयंतीची निमित्त यावर्षीही सामाजिक उपक्रमासोबत, किल्ले प्रतापगड दर्शन तसेच तुळजा भवानी दर्शन असा उपक्रम राबवण्यात आला आहे. दिनांक १८ फेब्रुवारी मंगळवार या दिवशी राजश्री शाहू महाराज नगरपालिका शाळा हांडे गल्ली येथे रक्तदान शिबिर होणार आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी तमाम बार्शीकरांसाठी शिवभोजनाचे आयोजन सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत करण्यात आले आहे. किल्ले प्रतापगड प्रदर्शन व देखावा दिनांक १८ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत खुला राहणार आहे. बार्शीकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अँड.सुशांत चव्हाण यांनी केले आहे.

  युवा प्रतिष्ठानचे सदस्य प्रत्येक वर्षी विविध शिवकालीन किल्ल्याना भेटी देऊन त्याचा हुबेहूब देखावा उभा करतो. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व इतिहासाची माहिती सर्वाना मिळावी व किल्ले पर्यटन वाढवा हा आमचा उद्देश आहे. शिवजयंतीतील देखावा, लायटिंग, किल्ला उभारणी अशी विविध कामातील ९९ टक्के काम प्रतिष्ठानचे सदस्य १५ दिवस स्वतः श्रमदानातून करतात हे आमचे वैशिष्ट्य असल्याचे

  रोहीत डोंगळे, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष, युवा प्रतिष्ठाण, बार्शी यांनी सांगितले.

  मंडळाचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे….

  संस्थापक अध्यक्ष अँड.सुशांत चव्हाण ,खजिनदार सदानंद गरड, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष रोहीत डोंगळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वायकुळे,भोजन कमिटी प्रमुख भोला अडसूळ,किल्ला बांधणी कमिटी स्वानंद धुमाळ, रक्तदान शिबिर प्रमुख अमर गाडे

  Best IT Comany In Maharashtra , Solapur