‘या’ अटीवर दारूची दुकान खुली होऊ सतत,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत
सर्व प्रकारच्या Software, Website, Mobile App, Digital Marketing साठी संपर्क 9890093759
नवी दिल्ली देशातील कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त राज्य महाराष्ट्र आहे. आतापर्यंत येथे 232 लोक मरण पावले आहेत. तसेच 4666 कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दारूच्या दुकानांवर मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करून राज्यात दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात.
सीएनबीसी टीव्ही 18 च्या म्हणण्यानुसार नुकतीच भारतीय अल्कोहोलिक पेय कंपन्यांनी (सीआयएबीसी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यामध्ये राज्यातील महसूल व रोजगाराच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने दारू विक्री सुरू करण्याचे सुचविले होते.
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतरच सार्वजनिक बाबींवर बंधने आणण्यात आली होती. त्यात हाॅटेल आणि दारूची दुकाने तातडीने बंद करण्यात आली. त्यातून अनेक मद्यपींना दारू न मिळाल्याने त्यांनी दारूची चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या.
मात्र या पेक्षाही दारूपासून मिळणाऱ्या अबकारी कराचे सरकारचे मोठे नुकसान होत आहे. राज्याला सुमारे वीस हजार कोटी रूपये दारूपासून मिळतात. राज्य सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. तसे असताना हा हक्काचा महसूल बुडणे अवघड झाले आहे.

आजच्या लाइव्हमध्ये याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी दुकाने केव्हापासून उघडतील, असे थेट सांगितले नाही. पण सोशल डिस्टन्सिंगचा निकष पाळला तर त्यांना बंद ठेवण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 3 मे रोजी लाॅक डाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर ही दुकाने सुरू राहू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.
राज्यात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृतांचीही संख्या सोमवारी थोडी फार कमी झाली; तेव्हाच कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या मात्र वाढली असून, दिवसभरात 65 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. विविध शहरांत 433 नवे रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात 9 रुग्णांचा जीव गेला आहे. परिणामी; मृतांची एकूण संख्या 223 झाली आहे.
दरम्यान, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 65 रुग्ण बरे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील सात आणि मालेगावातील दोघांचा मृत्य झाला असून, त्यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 पेक्षा कमी वयाचा एक रुग्ण आहे.
मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयरोग, मूत्रपिंडाचे आजार असल्याचेही पुढे आले आहे. राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 76 हजार 92 पैकी 71 हजार 611 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 4 हजार 666 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या कोरोनाबाधितांपैकी 572 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यभरातील 21 लाख 85 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 93 हजार 655 जणांना घरीच विलग राहण्याच्या (होम क्वॉरंटाइन) सूचना केल्या आहेत. तर 6 हजार 879जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
सोमवारी दिवसभरातील नवे रुग्ण 466
एकूण रुग्ण 4 हजार 666
मृत 9
एकूण मृत 223
सोमवारी बरे झालेले रुग्ण 65
बरे झालेले एकूण रुग्ण 572